शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

By admin | Updated: April 19, 2016 02:26 IST

तालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई जाणवत आहे. कारण शासनाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात गावे आणि वाड्यांची संख्या जास्त आहे

संजय गायकवाड,  कर्जततालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई जाणवत आहे. कारण शासनाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात गावे आणि वाड्यांची संख्या जास्त आहे. यावर्षी १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर तसेच बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त तीन गावे-वाड्यांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.कर्जत तालुक्याचा बहुतांश भाग आदिवासी आणि दुर्गम आहे. त्यात तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांपैकी एक वगळता अन्य नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. पेज नदी पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे हा परिसर सोडला तर अन्य भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते. त्यातही पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागात पाझर तलाव बांधण्यात आल्याने काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील मोठी लोकवस्ती ही दुर्गम भागात वसली असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत असते. अशावेळी त्या भागातील निर्माण होणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, तहसीलदार रवींद्र बाविस्कर, कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक थुळे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यावर सह्या आहेत. तालुक्यात एप्रिल २०१६ पासून १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर किंवा बैलगाड्या सुरू करण्यात येतील, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षी १० गावे आणि ३१ आदिवासी वाड्यांना टँकर पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईग्रस्त आदिवासी वाड्यांमध्ये यावेळी ३४ वाड्या सरकारी आराखड्यानुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या वाड्यांपर्यंत टँकरने पाणी पोचवावे, असा प्रयत्न पाणीटंचाई कृती समिती करणार आहे. १४ आदिवासी वाड्यांपैकी खांडस, मोग्रज, मिरचूल वाडीला टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पोहोचले आहेत. तेथून कर्जत तहसील कार्यालय आणि आता त्या तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहेत.> कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई सर्वत्र जाणवत आहे. तालुक्यातील दोन गावे आणि एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ते आमच्या कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले असून, जिल्हा प्रशासनाने एक टँकर मंजूर केला आहे. तो तालुक्यात येताच टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू केले जातील.- रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, कर्जत