शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई, १७ गावे, ५९ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 01:17 IST

या कृती समितीचे काम कोरोनामुळे झालेले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील लोकांचे लक्ष शासकीय टँकरकडे लागून राहिले आहे.

विजय मांडेकर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील १७ गावे आणि ५९ वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत. या कृती समितीचे काम कोरोनामुळे झालेले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील लोकांचे लक्ष शासकीय टँकरकडे लागून राहिले आहे.कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका असून, भौगोलिक रचनेमुळे उन्हाळा सुरू झाला की पाण्याची समस्या निर्माण होते. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक हे दुर्गम भागात राहतात. दरवर्षी त्यांना पाणीटंचाईच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागातील लोकांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरविण्याची वेळ शासनावर येत असते. मागील वर्षी ५० हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांना शासकीय टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात आले होते. यंदाच्या आराखड्यात तालुक्यातील १७ गावे आणि ५९ वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. या सर्व ७६ गाव-वाड्यांना शासकीय टँकरच्या माध्यमातून मार्च ते मे या कालावधीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. त्यासाठी ६८ लाख रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. पाणीटंचाई निवारण कृती समितीने तालुक्यातील काही नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती करण्याचे ठरविले असून जास्त पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी विंधन विहिरी खोदल्या जाणार आहेत. ज्या विंधन विहिरी नादुरुस्त आहेत, त्यांचीदेखील दुरुस्ती केली जाणार आहे. नवीन प्रस्तावदेखील मंजूर के ले आहेत.टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी मार्चपासून होणार होती. मात्र एप्रिल महिना संपायला आला असतानाही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.>कृ ती आराखड्यानुसारपाण्याची गरज असणारी गावे, वाड्यापाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील १७ गावांत टँकरने पाणी पुरविले जाणार आहे. त्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, भुतिवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, अंथरट वरेडी, चेवणे, मोहोपाडा, भोपळेवाडी, नांदगाव, ढाक, तुंगी, पेठ, अंथरट निड या गावांचा समावेश आहे.५८ वाड्या पाणीटंचाईग्रस्त असून, त्यात आनंदवाडी, भगताची वाडी, भक्ताची वाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटरवाडी, काटेवाडी, चाफेवाडी, मोरेवाडी, वडाची वाडी, टेपाची वाडी, पाली धनगर वाडा, आसल धनगरवाडा, सागाची वाडी, कळंब बोरीची वाडी, भुतिवलीवाडी, धामणदांड, चिंचवाडी, मिरचुलवाडी, काळेवाडी, आसलवाडी, नाण्यांचा माळ, ताडवाडी, बनाची वाडी, आषाणे ठाकूरवाडी, जांभूळवाडी वारे, सुतारपाडा, भागूची वाडी, भागूची वाडी - २, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, विकासवाडी, ठोंबरवाडी, हऱ्याची वाडी, गरुडपाडा, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंग वाडी, कोतवाल वाडी, ढाक कळकराई, मिरचोली, माणगाव ठाकूरवाडी खांडपे, स्टेशन ठाकूरवाडी, नवसूची वाडी, वारे जांभूळवाडी, खाडेपाडा आदिवासी वाडी, चहूची वाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, मेंगाळवाडी ठाकूरवाडी, नांदगाव विठ्ठलवाडी, दामत कातकरवाडी यांचासमावेश आहे.