शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रानसईतील आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न सुटला; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:26 IST

उरण तालुका अतिशय विकसित आहे, असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र, या तालुक्यातही आदिवासींना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

उरण : उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडीत डीपीवर्ल्ड टर्मिनल प्रशासनाने सीआरएस फंडातून जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (४) झाले.उरण तालुक्यातील रानसई येथील खैरकाठीवाडी, भुऱ्याचीवाडी, बंगल्याचीवाडी, मार्गाचीवाडी, कोंड्याचीवाडी, सागाचीवाडी अशा सहा आदिवासी वाड्यांतील  अनेक पाण्याच्या शासकीय योजना आत्तापर्यंत बारगळल्या आहेत. डीपी वर्ल्ड कंपनीने जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती करून पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.

उरण तालुका अतिशय विकसित आहे, असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र, या तालुक्यातही आदिवासींना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यासाठी डीपी वर्ल्ड टर्मिनलने जलशुद्धीकरण प्रकल्पाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव कामगार नेते महेंद्र घरत, डीपी वर्ल्डच्या सीईओ श्रद्धा गोळे, श्री सुब्रमण्यम, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास अधिकारी नीलिमा गाडे आदी उपस्थित होते.

रस्ता दुरुस्त करणार येथे येत असताना रस्त्याची अवस्था पाहिली. या आदिवासींना पक्क्या रस्त्याची निर्मिती करणे क्रमप्राप्त असून, आघाडी सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदनार्शखाली या रानसई आदिवासींचा रस्ता योग्यतेने बनविणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.