शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

By admin | Updated: February 3, 2016 02:21 IST

नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा

कर्जत : नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही.दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश टोकरे यांनी कल्याण-कर्जत राज्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता. नेरळ शहरात कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. त्यावेळी पुढील आठ दिवसात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात होईल, असे आश्वासन उप मुख्य कार्यकारी पी. एम. साळुंखे यांनी दिले होते. परंतु एक वर्ष उलटूनही या खतप्रकल्प निर्मितीला अद्याप सुरु वात झालेली नाही. त्यामुळे नेरळ शहरात जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज जाळण्यात येतो. सायंकाळच्या वेळी प्रचंड धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील होत आहे. नेरळ शहरात जमा झालेला कचरा हा कर्जत - कल्याण रस्त्यालगत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. नेरळ डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा झालेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. पुणे येथील एका संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येणार होती. त्यावेळी त्या संस्थेने येथे येवून जागेची पाहणी केली होती. या खतप्रकल्प निर्मितीसाठी जिल्हा परिषदेकडून ३० लाख रुपये आणि उर्वरित खर्च जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या निधीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांनी दिली होती. परंतु एक वर्ष उलटूनही अद्याप या खत प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने नेरळ शहरात जमा झालेला सर्व कचरा हा येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीने लवकर जिल्हा परिषदेकडे खतनिर्मिती प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ( वार्ताहर)