शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ; रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:14 IST

कोकण रेल्वेसाठी भूसंपादन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आजही नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे, ते राजकीय व प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच.

वडखळ : कोकण रेल्वेसाठी भूसंपादन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आजही नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे, ते राजकीय व प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच. यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.१९७८-८४ या कालावधीत कोकण रेल्वे प्रकल्पाकरिता आपटा ते रत्नागिरी मंगळुरूपर्यंत भूसंपादन करण्यात आले होते. कोकण रेल्वे प्रकल्पाकरिता आपटापासून पुढे भूसंपादन एकत्रित केले गेले. मात्र, १९९५ मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन गठीत करून आपटा ते रोहा दरम्यानच्या सर्वच प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्यात आले आणि रोहा पुढील प्रकल्पग्रस्तांना मात्र, नोकरीत सामावून घेतले आहे. एकत्रित भूसंपादन केले गेले. मात्र, नोकरी रोहा पुढील प्रकल्पग्रस्तांनाच का? असा प्रश्न आहे. तत्कालीन भूसंपादन अधिकारी रायगड यांनी त्या वेळी काही प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी दाखलेसुद्धा देऊ केले होते. मात्र, ते दाखले सध्या नामधारी कागद उरले असल्याचे दिसत आहे. आजही आपटा ते रोहा या रेल्वेच्या ७/१२ वर कोकण रेल्वे हेच नाव आहे, तरी आपटा ते रोहा या रेल्वेमार्ग मध्य रेल्वेकडे वर्ग करून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली. प्रकल्पग्रस्तांनी संघटना नोंदणीकृत करून रेल्वे प्रशासनाला जाग आणण्याचे मार्गसुद्धा अवलंबले, मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांची भेट, लाक्षणिक उपोषण, नवी दिल्ली रेल्वे बोर्ड येथे पत्रव्यवहार यांच्यासह राजकीय पक्षांच्या नेत्याची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. मात्र, कोणीही प्रतिसाद न दिल्याने कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे सर्वांनी एकमताने मंजूर केले.

टॅग्स :Raigadरायगड