शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खंडाळामध्ये पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: October 19, 2015 01:24 IST

पाणी नियमित येतच नाही आणि आलेले पाणी शुद्ध नसते. त्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आले आहे.... लहान मुलांनासुद्धा याचा त्रास होतो.

कार्लेखिंड : पाणी नियमित येतच नाही आणि आलेले पाणी शुद्ध नसते. त्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आले आहे.... लहान मुलांनासुद्धा याचा त्रास होतो...पिण्यासाठी शुद्ध पाणी आणण्यासाठी आम्हाला एक किलो मीटर असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीच्या नळ स्टॅडपोस्टवर जावे लागते... पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागते, तसेच पाणी सायंकाळच्या दरम्यान येत असल्यामुळे अंधार पडतो... त्यामुळे खंडाळा व नेहुली या गावांमधील महिलांनी रस्त्यावर जाताना जीव मुठीत घेवून जावे लागते... इतर गावांमधील महिला पाणी भरण्यासाठी आल्यामुळे तेथील स्थानिक महिलांना त्रास होतो... परंतु त्यांना येथील पाण्याची समस्या माहित असल्याने त्या हरकत घेत नाहीत...एप्रिल महिन्यापासून तर आमचे पाण्यासाठी खूपच हाल होतात...अशी व्यथा ग्रुप ग्रापमचांयत खंडाळामधील गावामधील महिलांनी मांडली आहे. अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रुप ग्रापमचांयत खंडाळामधील गावामधील नागरिकांना आठ ते दहा दिवसांतून एकवेळच पाणी मिळत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीमधील फक्त खंडाळा नेहुली आणि साईनगर या तीनच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून तीन इंचाच्या पाईपलाईनने साठवणूक पाणी टाकीमध्ये साठविले जाते ते पाणी आळीपाळीने तीन गावांना पुरविले जाते. ते सुद्धा आठ ते दहा दिवसांतून एकदाच ही वस्तुस्थिती असल्याची माहिती उपसरपंच अरुण नाईक यांनी दिली आहे. दोन तीन वर्षापूर्वी पाणी मुबलक असायचे मात्र सध्या वाढत्या लोकसंख्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. तिन्ही गावांतील कुटुंब साधारणत: आठशे इतकी आहेत. त्यामुळे एकावेळी मिळालेल्या पाण्यानंतर पुढले पाणी येईपर्यंत पाण्याचा साठा करावा लागतो. पाणी दर तीन महिन्यांनी तपाासले जाते. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली आहे आणि त्याचे काम सुद्धा चालू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी ही योजना राबविणार आहोत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या मागील जनगणनेनुसार ४ हजार १६४ एवढी असल्याची माहिती नाईक यांनी दिली. पाण्याच्या बाबतीत ग्रा.पं. कडे तक्रार अर्ज सुद्धा दिले जात आहेत. मात्र पाणी प्रश्न सुटत नाही अशी खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)