शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वारे जांभूळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 22:56 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्यापाड्यात जोडणाऱ्या या रस्त्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी जांभूळवाडीतील लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.

आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त भाजीपाला लागवड, पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्या शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र खराब रस्त्यांअभावी कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच बाजार गाठावे लागते. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चादरीची डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते.

या ठिकाणी अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने मोलमजुरीची कामे करून नागरिक उदरनिर्वाह करतात. मात्र लोकप्रतिनिधींनी येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील लोकांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. काही ठिकाणी २० ते २५ वर्षांपासून रस्त्यांची कामे झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. तीव्र उतार व चढावावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी वारे जांभूळवाडी रस्त्यावर मातीचा मुलामा चढवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो उपायही कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसून येत असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तातडीने उपाययोजना करून वारे जांभूळवाडी रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा, अशी मागणी येथील आदिवासी बांधव करत आहेत.वीस वर्षे झाली तरी आमच्या वाडीचे रस्ते झाले नाहीत, खराब रस्त्यांमुळे येथे गाड्या येत नाहीत. सरकारकडून आदिवासी भागात लक्ष दिले जात नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. - यशवंत कैवारी, जांभूळवाडी ग्रामस्थवाडीच्या रस्त्याची अवस्था खराब आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासात त्रास होतो. गाड्यांचीही वारंवार कामे निघतात. त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. - प्रकाश शिंगवा, जांभूळवाडी ग्रामस्थ