शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

जप्त सक्शन पंप लिलावाच्या प्रतीक्षेत, महसूल विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:29 IST

जप्त केल्यानंतर महाडमध्ये प्रांत कार्यालयामागे हे पंप ठेवण्यात आले होते. सध्या हे पंप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात असून अनेक वर्षांपासून पडलेल्या सक्शन पंपचा ढीग दिसत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : गेली अनेक वर्षे वाळू माफियांकडून अनधिकृत उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे सक्शन पंप वारंवार खाडीमध्ये जाऊन महसूल विभागाने जप्त केले. जप्त केल्यानंतर महाडमध्ये प्रांत कार्यालयामागे हे पंप ठेवण्यात आले होते. सध्या हे पंप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात असून अनेक वर्षांपासून पडलेल्या सक्शन पंपचा ढीग दिसत आहे. या पंपाच्या लिलावाबाबत अद्याप महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ते सार्वजनिक बांधकाम विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे.सावित्री खाडीमध्ये वाळू उत्खननाला हातपाटीद्वारे काही प्रमाणात परवानगी देण्यात आली. मात्र, अशा उत्खननातून कमी उत्पादन मिळत असल्याने वाळू माफियांकडून खाडीत वाळू उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात सक्शन पंपाचा वापर सुरू केला आहे. अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू उत्खननाला लगाम लावण्यासाठी अनेक वेळा महाड महसूल विभागाने कारवाई करत अनेक पंप जप्त केले व महाड प्रांत कार्यालयात आणून एका पटांगणात ठेवले.दरवर्षी जप्त करण्यात येणारे सक्शन पंपात वाढ होत असल्याने प्रांत कार्यालयाची मागील जागा सक्शन पंपाला अपुरी पडू लागली. त्यामुळे इथून पंप नवीन झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या समोरील मोकळ्या जागेत नेण्यात आले. चार ते पाच वर्षांत जवळपास ३५ सक्शन पंप जप्त करण्यात आले. या पटांगणात ठेवण्यात आलेल्या पंपांना जवळपास पाच वर्षे झाली असून, महसूल खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. सक्शन पंप भंगारात काढणे गरजेचे आहे. मात्र, महसूल विभागाकडून इतक्या वर्षात त्यासाठी साधी निविदाही काढण्यात आलेली नाही.खाडीमध्ये सक्शन पंपाच्या वापरामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या पंपाचा लिलाव झाला तर शासनाला भरपाई मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.ठेवण्यात आलेल्या सक्शन पंपामुळे एकतर सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा अडून राहिली आहे. त्यात पाणी साठत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक समस्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याला सामोरे जावे लागत आहे. या होड्या हटवण्यासाठी महसूल विभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रान्वये कळवले आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहरात आलेल्या पुरात यातील एक मोठी होडी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जात होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर येऊन ती थांबली, यामुळे कार्यालयाकडे येणारा मार्ग बंद झाला आहे.कार्यालयात येणाºया नागरिकांची वाहने किंवा दुचाकींना येथून ये-जा करताना अडचण होत असल्याने रस्त्यावर आलेली होडी तत्काळ हटवली गेली पाहिजे, असे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर यांनी सांगितले.जप्त केलेल्या सक्शन पंपांची अंदाजित रक्कम तयार करण्यात आली आहे. याबाबत लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. यापुढेही अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार,महाड

टॅग्स :Raigadरायगड