शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खोरा बंदर पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 1, 2016 02:36 IST

वर्षभर मुरुड जंजिरा किल्ल्यावर लाखो पर्यटक भेट देतात. याठिकाणी असलेल्या खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही

मुरुड/जंजिरा : वर्षभर मुरुड जंजिरा किल्ल्यावर लाखो पर्यटक भेट देतात. याठिकाणी असलेल्या खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत निधी उपलब्ध करून खोरा बंदराचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पूर्वी मुंबईवरून येतांना खोरा बंदरातून येणाऱ्यांची संख्या मोठी होती. रत्नागिरीला जाणारी चौगुले कंपनीची बोट जंजिरा किल्ल्याजवळ खोल पाण्यामध्ये थांबत असे त्यानंतर छोट्या बोटीने प्रवाशांना खोरा बंदरातील जेट्टीवर उतरवले जायचे. आणि घोडागाडीने मुरु ड -जंजिरा गाठता यायचे. कालांतराने एसटी सेवा सुरु झाली आणि खोरा बंदर हळूहळू नामशेष झाले. पर्यटनाला चालना देण्यासाठी खोरा बंदराचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे.जंजिरा किल्ल्यासमोरील खोरा बंदराच्या जेट्टीजवळ खोली कमी आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी हे बंदर सोयीचेआहे. राजपुरी जेट्टीवरून जंजिरा किल्ला पहायला पर्यटक लाखोंच्या संख्येने जात असतात. नुकतेच जाहीर आकडेवारीनुसार, सुमारे तीन लाख पर्यटक वर्षभरामध्ये मुरु ड-जंजिरा किल्ल्यावर भेट देत असल्याचे उघड झाले आहे. राजपुरी जेट्टीवर वाढणारा ताण पाहता एकदरा गावाला खेटून असलेल्या खोरा बंदरांमधून जंजिरा किल्ल्यावर यांत्रिकी बोटीमधून प्रवासी जाऊ लागले आहेत. डोंगरी गाव, राजपुरी, एकदरा अशा ठिकाणचे ग्रामस्थ या सेवेमुळे रोजगार मिळू लागला आहे. पण खोरा बंदराचे जुने वैभव लोप पावले आहे. खोरा बंदराचा परिसर उत्तम इमारतीने सजला होता. शौचालयाची व्यवस्था नवाब काळापासून होती. पण जंजिरा बोट सेवा सुरु झाली. तेव्हा संपूर्ण खोरा बंदर उध्वस्त झाले होते व अजून तसेच आहे. डोंगरी गावामधील विश्वास भोसले यांनी आपल्या आठवणी सांगतांना खोरा बंदराचा संपूर्ण वैभवशाली इतिहास सांगितला. पन्नास वर्षापूर्वी इथे उपहार गृह होते. दिवस - रात्र माणसांची रेलचेल होती. ओहटी असल्यावर मुरु ड, एकदरा येथील मासेमारी करणाऱ्या बोटी खोरा बंदराचा आसरा घेत असत. गतवैभव परत मिळवण्यासाठी, खोरा बंदराचा विकास होणे गरजेचे असून त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)खोरा बंदराच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत . त्यामुळे लवकरच इथे पर्यटकांसाठी अधिक सोयी उपलब्ध करून देऊ. लवकरच खोरा बंदराचे गतवैभव परत मिळवू- उमेश पाटील, तहसीलदार, मुरुड