शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या आगमनाची माथेरानकरांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:26 IST

माथेरानकरांच्या व्यावसायिक क्षेत्रातील आठ महिन्यांच्या काळातील पहिलाच आॅक्टोबर महिना अतिशय मंदीत गेला आहे.

- मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानकरांच्या व्यावसायिक क्षेत्रातील आठ महिन्यांच्या काळातील पहिलाच आॅक्टोबर महिना अतिशय मंदीत गेला आहे. त्यामुळे या दिवाळीत व्यवसाय वाढेल या आशेने आतापासूनच लहान-मोठ्या स्टॉलधारक, व्यावसायिक ते हॉटेल्सधारक सर्वच जण तयारीला लागले आहेत. हॉटेल्सधारकांनी आपापल्या हॉटेल्समध्ये रंगरंगोटी तसेच आकर्षक सजावट,विद्युत रोषणाई केलेली आहेअनेक मंडळी ही इथल्या मिनीट्रेनच्या सफरीसाठी येत असतात. रेल्वे प्रशासनाने याकामी नेरळहून नियमितपणे पहाटे ६.४० वाजता एक गाडी तर दर शुक्रवारी नऊ वाजता एक गाडी माथेरानकरिता धावणार आहे. अनेकांना या गाडीची मजा लुटण्यासाठी वेळेअभावी हिरमोड जरी झाला तरीसुद्धा त्यांच्या आनंदात कुठल्याही प्रकारे विरजण न पडता त्यांना मिनीट्रेनच्या प्रवासासाठी दस्तुरी येथे मोटार वाहनाने उतरल्यावर अमन लॉज रेल्वे स्थानकावर शटल सेवेच्या माध्यमातून माथेरानपर्यंतच्या प्रवासाचा आनंद आपल्या बाळगोपाळांना सोबत घेऊन लुटता येणार आहे. माथेरानकरांसह कर्जत तालुक्यातील ज्यांचे पूर्णत: जीवनमान माथेरान या शहरावर निगडित आहे ते सर्वच पर्यटकांच्या आगमनाची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत.पर्यटक माथेरानकडे अधिकाधिक कशाप्रकारे आकर्षित होतील यासाठी आम्ही त्यांना ग्रह ताऱ्यांची माहिती आणि निरीक्षण करता यावे यासाठी आकाशगंगा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. उद्यानांत आकाश पाळणे तसेच मनोरंजनासाठी अन्य करमणुकीसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून सेवा पुरविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध राहणार आहे.- रामदास कोकरे, प्रभारी मुख्याधिकारी,माथेरान नगरपरिषदपूर्वी इथे शाळा, कॉलेजच्या ट्रीप मोठ्या प्रमाणावर येत होत्या. त्यामुळे सर्वांना व्यवसाय मिळत होता. या ट्रीपच्या मुलांना सर्व सोयी-सुविधा कशाप्रकारे उपलब्ध होऊन त्यांची संख्या वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आगामी काळात अनेक प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास जाणार आहेत, त्यामुळे पर्यटन व्यवसाय आपोआपच वृद्धिंगत होण्याची चिन्हे दिसत आहेत.- प्रसाद सावंत,गटनेते,माथेरान नगरपरिषद

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड