शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:10 IST

विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. आॅनलाइन मते मिळवण्यात नाशिक जिल्हा ३० हजार मते मिळवून सर्वात पुढे आहे, तर रायगड जिल्हा १२ हजार मते घेऊन आठव्या स्थानावर आहे, ही आकडेवारी शुक्रवारपर्यंतची आहे.१ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत तुम्हाला तुमचे मत द्यायचे आहे, यासाठी ‘एसएसजी १८’ हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वेक्षणात भारतातील सर्व जिल्ह्यांचे प्रामुख्याने तीन मानकांच्या आधारे जिल्ह्यातील व गावातील स्वच्छता व स्वच्छतेशी निगडित कामांची गुणवत्ता, संख्याबळ लक्षात घेऊन स्वतंत्र संस्थेमार्फत रँकिंग ठरवण्यात येणार आहे.सर्वेक्षणाद्वारे निश्चित होणारे गुणांकन हे एकत्रित मानकांच्या आधारे जिल्ह्यातील काही गावांतील सार्वजनिक ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणची निरीक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेची समज आणि मते घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार यासाठी घेण्यात येणार आहे. या सर्व्हेचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांची आणि राज्याची स्वच्छतेमधील स्थानासह क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रमग्रामपंचायत आणि सर्व सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य ठेवणेवैयक्तिक शौचालयाचा वापर आणि फोटो अपलोडिंग १०० टक्के करणेनादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करून त्याचा वापर करणेशौचालयाच्या स्थितीबाबतचा रेकॉर्ड ठेवणेस्वच्छग्राही यांनी सक्रिय सहभाग घेणेनिगराणी समिती गठीत करून ती सक्रिय करणेसांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणेउपक्रमांची विविध मार्गाने जनजागृती करणे‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड सर्वेक्षणासाठी नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे. ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाइन सहभाग घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट २०१८ कालावधीत होणार आहे.असे असेल स्वच्छ सर्वेक्षणकेंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.गावातील विविध लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. एसएसजी १८ या अ‍ॅपवरील मतेही प्रामुख्याने विचारात घेतली जाणार आहेत.एका क्रमांकासाठी एकच मतएसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर एका मोबाइल क्रमांकाच्या व्यक्तीला एकदाच मत देता येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मते नोंदवून जिल्ह्याला पहिल्यास्थानी आणावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या