शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून वीटभट्टी कामगार रोह्यात दाखल

By admin | Updated: November 17, 2015 00:07 IST

दिवाळी सणानंतर वीटभट्टी व्यावसायिक आपल्या परंपरागत व्यवसायाकडे वळतात. वीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जमवाजमव करून वीट व्यावसायिक हे

धाटाव : दिवाळी सणानंतर वीटभट्टी व्यावसायिक आपल्या परंपरागत व्यवसायाकडे वळतात. वीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जमवाजमव करून वीट व्यावसायिक हे वीटभट्टी कामगारवर्गाची वाट पहात असतो. त्यामुळे वीटभट्टीचा व्यवसाय सुरु झाला असल्याने आता रोह्यासह ग्रामीण भागात वीटभट्टी कामगार हजर झाल्याचे दिसते.वीटभट्टी उद्योगासाठी विशेषत: कर्नाटक, गुलबर्ग्याहून हंगामी कुशल कामगार कामासाठी सध्या रोह्यात हजर झालेत. रोह्यात विशेषत: पिंगळसई, शेणवई, कोलाड, खांब, गोवे यांसह इतर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वीट व्यावसायिकवर्ग वीटभट्टीचा व्यवसाय करताना दिसतो. शेतीनंतर उन्हाळी व हिवाळी हंगामात वीटभट्टी व्यवसाय हा त्यांचा ठरलेला असतो. आपले कर्नाटक राज्य सोडून हे कामगार महाराष्ट्रात एकत्र येऊन काम करीत स्थलांतर करीत असतात. या व्यवसायात काम करीत असताना माती काढून ती वाळविणे, त्यानंतर माती पाणी आणि भाताचा भुसा व्यवस्थित एकत्र करून वाळविल्यानंतर साच्यात भरून त्याला योग्य आकार देणे, त्यांचा थर लावून सुस्थित ठेवून कच्च्या विटांना भाजणे, अशी कामे हे कामगार करताना दिसत आहेत. या कामगारांना आणण्यासाठी सहा महिने अगोदरच खर्ची म्हणून काही रक्कम वीट व्यावसायिकांकडून देऊ केलेली असते. मात्र प्रत्येक आठवड्याला कामगारवर्गाला त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून मजुरी दिली जाते. (वार्ताहर)