शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष

By admin | Updated: May 24, 2016 01:44 IST

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

मुरु ड/ बोर्ली मांडला : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आगंतुक कक्षामध्ये पारपत्र, चारित्र्य पडताळणी, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत मिळणारे विविध प्रकारचे परवाने तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एक खिडकी योजनेप्रमाणे आगंतुक कक्षाचे कामकाज चालणार आहे. ‘समाधान हेल्पलाइन’ याच कक्षाचा एक भाग आहे. याद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे सात दिवसात सोडवून समाधान करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे नागरिकांनी नोंदविलेल्या तक्र ारींचे निराकरणही या कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. आगंतुक कक्षामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून एक अधिकारी हे आगंतुक कक्षाचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत. तर दुसरे जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. आगंतुक कक्ष हे प्रशस्त, वातानुकूलित व अत्याधुनिक सोयी - सुविधांनी युक्त असे स्थापन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी नागरिकांकरिता विविध प्रकारची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे २६ जानेवारी २०१६ पासून कार्यान्वित झालेल्या ‘आपले सरकार’ या योजनेची सांगड ही समाधान कक्षाशी घातली जाणार आहे. (वार्ताहर)नागरिकांना आवाहननागरिकांनी आपल्या समस्या निराकरणासाठी समाधान कक्षाशी संपर्कसाधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे तक्रारीचे लवकर निराकरण होणार आहे.