शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेला जिते गावात यात्रा

By admin | Updated: May 9, 2016 02:26 IST

जिते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गाव, समुद्रात मासेमारी करण्यासाठी यांत्रिकी ट्रॉलरवर खलाशी म्हणून या गावातील अनेक जण काम करतात.

पेण : जिते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गाव, समुद्रात मासेमारी करण्यासाठी यांत्रिकी ट्रॉलरवर खलाशी म्हणून या गावातील अनेक जण काम करतात. हा धाडसी व्यवसाय करतानाच श्री देव लक्ष्मीनारायणावर अखंड गावाची असीम श्रद्धा आहे. यामुळे एरव्ही मांसाहार करणारे गावकरी उत्सव कालखंडात १५ दिवस नेमाने शाकाहार करतात. ही उत्सवाची परंपरा ५३ वर्षे सुरू आहे. मंगळवारी अक्षयतृतीयेला जिते गावात यात्रा ही आनंदाची पर्वणी भक्तगण व शेतकरी बांधवांसाठी शुभमुहूर्ताचा उत्साही क्षण असतो.गुरुवारी ५ मे ते ११ मे २०१६ पर्यंत आठवडाभर लक्ष्मीनारायण महोत्सव गावात भक्तिभावाने साजरा होतो. यंदा ५३ वे वर्ष असून, नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्ती घरी त्यांच्या, अशा स्वरूपाचं भक्तीमय वातावरण गावात आहे. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन सोहळा, हरिपाठ, दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी अक्षयतृतीयेचा लक्ष्मीनारायण देवतेचा मुख्य उत्सव, सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यत मुंबईचे कीर्तनकार हभप रुपेश सुर्वे यांचे पुष्पवृष्टीवर आधारित सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांना होणार आहे. गेले पाच दिवस सकाळ, संध्याकाळ महाप्रसाद असून, मंगळवारी रात्री ८ वा. श्री चा पालखी सोहळा, याच वेळेत रात्री ९ वा. रात्रीचा महाप्रसाद, ९.३० वाजता महिला संगीत भजन स्पर्धा असा हरिनाम संकीर्तनाचा गजर दिवसभर अक्षयतृतीयेच्या दिवशी चालणार आहे. १० मे ललिताचे कीर्तनाचे, ११ मे रोजी श्रीसत्य नारायण महापूजेने या उत्सवाची सांगता होणार आहे.सबंध परिसरात एक जागृत देवस्थान म्हणून लक्ष्मी नारायण देवाचा लौकिक आहे. १९८९ च्या महापुरात या गावाचे खलाशी अरबी समुद्रात वादळात अडकले. सर्वांनी त्यांच्या परतण्याची आशा सोडून दिलेली असताना लक्ष्मीनारायणाच्या प्रती असलेल्या श्रद्धाभावभक्तीने गावातील मासेमारी करणारे खलाशी सुखरूप परतले. त्यामुळे लक्ष्मीनारायणावर त्यांची असीम श्रध्दा आहे. श्री लक्ष्मी नारायण मंडळ जिते व ग्रामस्थ मंडळ जिते यांच्यावतीने आठवडाभर या उत्सवाचं पावित्र्य राखले जाते.