शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:31 IST

लाखो रुपयांची उलाढाल; स्थानिकांना मिळाला चांगला रोजगार; १३ शिडांच्या बोटी करतात ने-आण

- संजय करडे मुरुड : तालुक्यातील राजपुरी गावात असणाऱ्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास सन २०१९ या वर्षात देश -विदेशातील सुमारे साडेचार लाख पर्यटकांनी भेट दिली. चारही बाजूला समुद्र व मध्यभागी हा किल्ला असल्याने पर्यटकांना शिडांच्या होड्यांमधून प्रवास करून या किल्ल्यावर पोहोचावे लागते. जंजिरा हा किल्ला ३५० वर्षांपूर्वी बांधलेला असूनसुद्धा पूर्वी जसा होता तसाच ताठ मानेने व दिमाखात हा किल्ला उभा आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूस समुद्राचे खारे पाणी असून सुद्धा या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. २२ एकर परिसरात व २२ बुरुज असलेला हा महाकाय किल्ला पर्यटकांना मोठा आकर्षण ठरला आहे. येथे येणाºया पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळाला असून लाखो रूपयांची उलाढाल झाली आहे.या किल्ल्यास दरवर्षी पर्यटक लाखोंच्या संख्येने भेट देत असतात. किल्ल्यात जाण्यासाठी जंजिरा पर्यटक सोसायटी या संस्थेस महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून परवाना देण्यात आला आहे. या संस्थेच्या १३ शिडांच्या बोटी असून यामधून पर्यटक ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे खोरा बंदरातून सुद्धा किल्यात ने-आण केली जात असते. दिघी बंदरातून सुद्धा जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना आणले जाते.जंजिरा पर्यटक सोसायटीच्या व्यस्थपकानी सांगितले की, जंजिरा किल्ल्यावर ये-जा करण्यासाठी ६१ रुपये तिकीट आकारले जाते. पर्यटकांची संख्या वाढली तर आम्ही जादा बोटींची संख्या उपलब्ध करून देतो; कारण किल्ला पहाण्यास विलंब होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न जास्त असतात. हा किल्ला पहाण्यासाठी जे पर्यटक राजपूरी जेट्टीवर धडकतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.या जेट्टीवर नारळ पाणी, सरबत,विविध टोप्या ,गॉगल्स ,अश्या विविध दुकाना मधून स्थानिकांना लाखो रुपयांचा धंदा होत आहे. तर लाखोंच्या संख्येने पर्यटक आल्याने महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डास लेवी च्या रूपात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर पुरातत्व खात्याने तिकीट आकारणी सुरु केल्याने त्यांना सुद्धा मोठे उत्पन्न मिळत आहे.पूर्वजांच्या महान आणि अप्रतिम वास्तुमुळे मुरुड तालुक्याला मोठे महत्व प्राप्त झाले असून दरवर्षी पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात वाढत असून सलग सुट्यात तर पर्यटकांच्या गाड्यांची मोठी रेलचेल दिसून येते.