शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साळविंडे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:37 IST

म्हसळा वनविभागाचे सहकार्य; टंचाई काळात होणार साठलेल्या पाण्याचा उपयोग

म्हसळा : संयुक्त वन व्यवस्थापन समिती साळविंडे देवळाचीवाडी ग्रामस्थांनी रोहा वनविभाग म्हसळा परिक्षेत्राच्या मदतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे. पाणीटंचाईच्या काळात सुमारे १० हजार लिटर पाणी साठेल, एवढ्या क्षमतेचा गावाशेजारील नदीपात्रात वनराई बंधारा बांधून शासनाच्या ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ मोहिमेस सुरुवात केली आहे.परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरणाक, वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांचे मार्गदर्शन घेऊन साळविंडे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधकाम करण्यासाठी २५० मातीबंद पिशव्यांच्या मदतीने पाणी साठवण बंधारा दिवसभरात पूर्ण केल्याची जांभुळ बिट वनरक्षक सूर्यतळ यांनी माहिती दिली व वनराई बंधाऱ्याचे महत्त्व ग्रामस्थांना विशद केले. बांधण्यात आलेल्या साठवण बंधाºयातील पाणी ग्रामस्थ शेतकरी, वन्यजीव आणि पशूपक्षी यांना पिण्यासाठी उपयोगास येणार आहे.रोहा वनविभाग उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनसंरक्षक केसरनाथगोडबोले, म्हसळा परिक्षेत्र वनाधिकारी नरेश पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यात मोठ्या लोकवस्ती असलेल्या गावांत वनविभागाच्या सर्व प्रकारच्या शासनाच्या योजनांंचा लाभ दिला जात असल्याने ग्रामस्थ आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा वनविभागाबाबत विश्वास वाढला आहे, यामुळे वृक्षतोड कमी होऊन वनसंरक्षण, वृक्षलागवड, वन्यजीव संरक्षण कामात वाढ होत असल्याचे परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरणाक यांनी सांगितले. साळविंडे संयुक्त वन ग्राम समितीचे उत्कृष्ट कामाचे मोल व्हावे, यासाठी वनविभाग जांभुळ बिट मार्फत या समितीला संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांनी सांगितले.बंधारा बांधकाम करण्यासाठी वन समिती अध्यक्ष महादेव तावडे, समाजसेवक रामशेठ पारदुले, लक्ष्मण शिंदे, पांडुरंग सातप आदीसह सुमारे १०० ग्रामस्थ महिला मंडळाने सहभाग घेतला होता. साळविंडे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधण्यात मोलाचे योगदान दिले, त्याबद्दल म्हसळा वनविभागाने त्यांना धन्यवाद दिले.

टॅग्स :Raigadरायगडforest departmentवनविभाग