शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आधाराविना परातीत उभे मुसळ पाहून गावकरी अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:38 IST

सूर्यग्रहणाची किमया; अजब दृश्य पाहण्यासाठी खर्डी खुर्द गावात गर्दी

माणगाव : संपूर्ण महाराष्ट्रात २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८ ते ११.४७पर्यंत सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणावेळी माणगाव तालुक्यातील माणगावपासून ८ कि.मी. असलेल्या खर्डी खुर्द गाव येथील घराच्या अंगणात जुन्या पारंपरिक पद्धतीनुसार एका मोठ्या ताटात (परातीत) पाणी ठेवून त्यामध्ये भात कुटण्याचे ४ फूट उंच आणि ४ इंच गोलाकार मुसळ आधाराशिवाय सहजी उभे केले होते. हे लाकडी मुसळ या सूर्यग्रहणाऐवजी इतर वेळी कधीही आधाराविना उभे राहू शकत नाही; परंतु ते सूर्यग्रहणाच्या वेळी उभे राहते असे जुनेजाणते गावकरी सांगतात. हे अजबदृश्य पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी के ली होती.या सूर्यग्रहणाबद्दल खर्डी खुर्द येथील एक वयोवृद्ध महिला नाभीबाई मोरे म्हणाल्या की, सूर्यग्रहणावेळी गरोदर मातेने, लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, आपल्या घरातील देवांवर कोणाचीही नजर पडू नये यासाठी काहीतरी कापड टाकून त्यांना झाकून ठेवावे. ज्यावेळी आपण ताटामध्ये (परातीमध्ये) मुसळ उभे करतो तेव्हा ग्रहण सुटण्यासाठी देवाकडे याचना केली जाते की, ‘सोड गिºहाण... आमच्या देवाला सोड..! त्यावेळी त्याला हळद-कुंकू, तांदूळ वाहून त्याच्या पाया पडायचे आणि त्यानंतर ज्यावेळी ग्रहण सुटते; त्यावेळी ते मुसळ आपोआप खाली पडते अन्यथा पडत नाही. यंदा वर्षाअखेरीस आलेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशीच सकाळी आणि आदल्या दिवशीही रात्री अवकाळी पाऊस पडला. आकाश पूर्ण ढगाळलेले होते. त्यामुळे या ठिकाणी सूर्यग्रहण नीट पाहावयास मिळाले नाही.लोक म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुतूहलाने या ग्रहणाकडे पाहणारे आणि आध्यात्मिक पारंपरिकतेने पाहणारे या दोघांनाही सारखाच विचार करायला भाग पाडणारे चित्र या ग्रहणामुळे पाहावयास मिळत आहे.