शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:51 IST

एक महिन्याच्या आत काम सुरू करण्याचे नगराध्याक्ष्यांचे आश्वासन; उपोषण स्थगित

कर्जत :  चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाल्यामुळे भिसेगावमधील ग्रामस्थांनी २४ जानेवारीला उपोषण सुरू केले होते; मात्र हा रस्ता कर्जत नगरपरिषद हद्दीत असल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी रविवारी दुपारी उपोषण स्थगित केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाल्यामुळे भिसेगावमधील ग्रामस्थ रमेश किसन हजारे, दिनेश लक्ष्‍मण भरकले आणि अजित पांडुरंग राऊत यांनी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता भिसेगाव येथे उपोषण सुरू केले होते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत आहे; मात्र रस्ता तांत्रिक अडचणीमुळे होत नसल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यहार करून रस्ते विकास योजनेअंतर्गत कर्जत नगरपरिषद हद्दीतील मंजूर झालेल्या कामाचे नाव श्रद्धा हॉटेल ते भिसेगाव चौक, भिसेगाव ते कर्जत चार पदरी पर्यंतचे रस्ता तयार करण्याऐवजी श्रद्धा हॉटेल ते चार पदरी रस्ता म्हणजे चार फाटा बदलून मिळण्याबाबत ५ ऑगस्ट २०२० रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्स्त्याचे काम अद्याप सुरू केले नाही, या खराब रस्त्यावरून वाहन चालविणे वाहन चालक याला जिकिरीचे झाले होते. म्हणून भिसेगावमधील ग्रामस्थ यांनी उपोषणचा मार्ग अवलंबला तसा पत्रव्यवहार सार्वजनिक विभाग कार्यालय यांच्याशी केला.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ जानेवारीला उपोषणकर्ते यांच्याशी पत्रव्यवहार करून कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल हा रस्ता नगरपरिषद कर्जत त्यांच्या हद्दीत येत असल्यामुळे कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल हा रस्ता कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्याबाबत नगरपरिषद यांच्यामार्फत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने प्रस्ताव अर्ज करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे एमएमआरडीए मुंबई यांच्यामार्फत कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी इतका निधी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून, या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीत आहेत असे सांगण्यात आले. तरी आपण याबाबत नगरपरिषद यांच्याशी संपर्क साधावा व २३ जानेवारीला आयोजित केलेले उपोषण करू नये अशी विनंती उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी उपोषणकर्त्यांना पत्राच्या मार्फत केली होती.

उपोषणकर्ते याचं या पत्रावर समाधान झाले नाही. अखेर २३ जानेवारीला उपोषण सुरू केले. यावेळी दुपारी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली, यावेळी त्यांचासमवेत उपनराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, कर्जत नगररचना सहायक लक्ष्मण माने, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता कुणाल गोसावी उपस्थित होते. यावेळी भाजपचे नेते रमेश मुंढे, दीपक बेहेरे, सरस्वती चौधरी, ग्रामस्थ सुरेश भरकले, राकेश देशमुख, जगदीश दिसले, प्रभाकर हजारे, पंढरीनाथ लबडे, मोहन भोईर, पोलीसपाटील संजय हजारे, आदी उपस्थित होते.

अद्यापपर्यंत हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग झाला नाही; मात्र याबाबाबत मी त्याचा पाठपुरावा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक महिन्याच्या आत या रस्त्याचे काम सुरू करेन, असा शब्द उपोषणकर्त्यांना दिला. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिलेल्या शब्दाचा मान ठेवून उपोषणकर्त्यांनी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते उसाचा रस पिऊन उपोषण स्थगित केले.