शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या पुराच्या पाण्याने दासगावच्या ग्रामस्थांनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:03 IST

२६ जुलै २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्याने दासगाव परिसरात हाहाकार उडाला.

दासगाव : मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून महाडमध्ये पुन्हा जोरदार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. बघता बघता पाण्याने जोर धरला. पूर्ण महाड तालुक्याला हादरून काढले. संपूर्ण दासगाव परिसर जलमय झाला. २६ जुलै २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्याने दासगाव परिसरात हाहाकार उडाला. राष्ट्रीय महामार्गावर पाणी भरल्याने एक ट्रक पाण्यामध्ये वाहता वाहता वाचला.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून पावसाने जोर धरत महाड तालुक्यातील संपूर्ण खेड्यापाड्यांना झोडपून काढले. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजल्यापासून अचानक पुराच्या पाण्याने जोर धरला. बघता बघता संपूर्ण तालुक्याला वेढा घातला.अचानक वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे दासगाव बंदर रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्गच बंद पडला. त्यामुळे बंदर विभागातील नागरिकांची रहदारी बंद पडली. अनेक घरांमध्ये अचानक पाणी शिरल्याने सर्व दासगावकरांना २६ जुलै २००५ च्या पुराच्या पाण्याची आठवण करून दिली. त्यामुळे बंदर विभागातील अनेक नागरिकांनी घरदार सोडून मुलाबाळांसह या विभागातून पळ काढला.संध्याकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी चढत घरादारात, दुकानात शिरत गेल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पाण्याशेजारी असलेल्या दुकानदारांनी आणि घरमालकांनी आपले आतील सामान व्यवस्थित, सुरक्षित ठेवत रात्र या पाण्याच्या भीतीने जागून काढली. या पुराच्या पाण्यामुळे कोणती मोठी हानी झाली नसली तरी संपूर्ण दासगावमध्ये रात्रभर घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासूनच वीज गायब झाल्याने धावपळ झाली.