शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वेलटवाडी गाव होणार आत्मनिर्भर , आदिवासींना २२ हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 00:55 IST

अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती.

रायगड : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीमधील वेलटवाडी आदिवासी वाडीमधील रहिवाशांना आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत त्यांच्या हक्काची २२ घरे बांधून देण्यात येणार आहेत. खानाव ग्रामपंचायत, सरकार आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राज्यातील पहिलाच असण्याची शक्यता आहे.अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती. डोक्याला दगड आणि आकाश पांघरून घेण्याची वेळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांवर आली होती. यासाठी त्यांना वन विभागाच्या जागेमध्ये तात्पुरत्या झोपड्या उभारून देण्यात आल्या. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मदत केली होती,झोपड्या उभारण्यात आल्याने, वन विभागाने जमीन खाली करण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. तात्पुरत्या झोपड्या दूर करण्याची कार्यवाही वनविभागाने सुरू केली होती. या कार्यवाहीला स्थगिती मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड, वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. सरकारकडून निर्णय येत नव्हता, तर दुसरीकडे वन विभाग चांगलेच हट्टाला पेटले होते. ग्रामस्थांनी स्वखर्चाने वेलवली येथे ३१ गुंठे जमीन विकत घेतली. आॅल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्था, रायगड महसूल विभाग आणि खानाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता या जागेत आदिवासींना कायमस्वरूपी २२ घरे बांधून देणार आहे.या आत्मनिर्भर गावामध्ये घरांसोबतच समाज मंदिर, बगीचे, शौचालये, रस्ते, विद्युत दिवे, सीसीटीव्ही यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.सरकार, प्रशासन आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहिलो आहोत. आताच्या उपक्रमामुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे हे गाव आत्मनिर्भर गाव म्हणून ओळखले जाईल, असे रायगड काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी सांगितले.अनंत गोंधळी यांनी आदिवासी बांधवांना निवारा मिळण्यासाठी केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांनी सांगितले.आत्मनिर्भर गाव भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी (दि.१ सप्टेंबर) रोजी भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार, अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद, सरपंच अनिता गोंधळी, काँग्रेस उपाध्यक्ष अनंत गोंधळी, जितेंद्र गोंधळी आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या डोंगरावर २५ आदिवासी कुटुंबे गेली दीडशे वर्षे राहत होती. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटुंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागली. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबांच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवासींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजुरीही दिली. मात्र, याच महिन्यात आलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ या आदिवासी बांधवांना पुन्हा उघड्यावर आणले. आता वनविभागाच्या वारंवार येणाºया नोटिसांपासून सुटका झाली. गावात स्वत:चे घर मिळणार असल्याने आम्ही समाधानी असल्याचे संदेश गडखळ यांनी दिले.

टॅग्स :Raigadरायगड