शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By admin | Updated: May 2, 2016 01:07 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभास रायगडचे पालकमंत्री

अलिबाग:महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभास रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता हे गैरहजर राहिल्याने अखेर रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलीकनेर, नूतन अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल उपस्थित होते.ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर विशेष कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये खोपोलीचे पोलीस निरीक्षक सावता शिंदे, पोलीस हवालदार (मुख्यालय) श्रीकांत म्हात्रे, माणगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरीक्षक (अलिबाग) तुकाराम पवळे, दिघी सागरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोगले, आदर्श तलाठी पुरस्कार विजेते सी.एस. राऊत, यानंतर बॉम्ब शोध पथक, अग्निशमन दल, पोलीस दल, होमगार्ड, महिला पोलीस पथक, पोलीस दलाचे बँड पथक आदी पथकांनी संचलन करु न मानवंदना दिली. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाकडे ग्रामपंचायत सदस्यांची पाठनागोठणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापन दिन शहरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील सर्व शाळा, पोलीस ठाणे, वन कार्यालय याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य कार्यक्र म ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाला. सरपंच प्रणय डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या सतरा आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सतरापैकी केवळ तीनच सदस्य उपस्थित होते. मात्र चौदा सदस्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सांस्कृतिक कार्यक्रमरेवदंडा : रेवदंडा परिसरात महाराष्ट्र दिन उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली मोरे यांनी ध्वजारोहण केले. याप्रंसगी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. पारनाका येथे नवचैतन्य मंडळातर्फे महापूजेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवकांची पाठ कर्जत : कर्जत तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगरपरिषदेच्या प्रांगणातील ध्वजारोहण प्रसंगी महिला नगरसेवकांची उपस्थिती होती मात्र नगरसेवकांनी पाठ फिरविल्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. कर्जतमध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापन दिन कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगरपालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयातील ध्वजारोहण आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील ध्वजारोहण प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते झाले.