शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानंतरही पुगाव पूल तुटलेल्या अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

तालुक्यातील पुगाव (मढाली) येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षीपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या धोकादायक तुटलेल्या पुलावरून

रोहा : तालुक्यातील पुगाव (मढाली) येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षीपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या धोकादायक तुटलेल्या पुलावरून १९ गावांतील जनता आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याने येथे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या नंतरही अद्याप या पुगाव पुलाच्या प्रश्नाकडे ना कोणत्या राजकीय नेत्याचे लक्ष आहे ना संबंधित प्रशासनाचे, त्यामुळे १९ गावांतील जनतेला धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने, प्रशासनाच्या या गलथान कारभारापुढे येथील जनता हतबल झाली आहे.डोलवल बंधाºयाकडून आरसीएफकडे जाणारा तीर हा कालवा आहे. हा कालवा रस्त्यालगत असल्याने पुढील रहदारी करता त्याच्यावर पूल टाकण्यात आला आहे. हा पूल तब्बल १९ गावांसाठी महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग ठरत आहे, परंतु हा पूल अतिशय जीर्ण झाल्याने तो मागील वर्षापूर्वी अचानक कोसळला व १९ गावातील जनतेचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे येथील जनतेला महत्त्वाची बाजारपेठ असणाºया कोलाड नाक्यावर किंवा खांबला यावयाचे झाले तर कालव्याच्या दिशेने उलटा प्रवास करावा लागतो. अगदी जवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारी बाजारपेठ आता पंधरा ते वीस किलोमीटरच्या दूर अंतरावर पडत आहे. त्यामुळे येथील जनतेची गैरसोय झाली आहे. काही दिवसांपूर्वी विटा घेऊन जाणारा मालवाहू ट्रक कालव्यात पलटी झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी या गाडीचे व वीट मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर हा तुटलेला पूल अचानक खाली जावून अपघात घडला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे.