शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:13 IST

शेती जाणार पाण्याखाली : वादळामुळे शेतक ऱ्यांवर दुहेरी संकट

दिघी : वादळामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले असताना, त्यातच आता शिस्ते- दिवेआगर मार्गावरील खाडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसू लागले आहे. मात्र, संबंधित प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसल्याचे दिसते आहे. यामुळे शेतकºयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक शेतकºयांचे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. हे सहन करीत असताना कुठे चार घास खायला मिळतील, या उद्देशाने जगणारा शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. दिवेआगर खाडीलगत बोर्लीपंचतन परिसरातील आठ ते दहा गावांतील अनेक शेतकºयांची खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भाताचे उत्पन्न घेतात. खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये, यासाठी भक्कम दरवाजे असलेली ‘सात उघडी’ आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकºयांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. सध्या शेतकरी भातशेती करीत असल्याने भरतीचे पाणी खाडीद्वारे शेतीत येऊ लागल्याने शेतकºयांच्या संकटात आणखीच वाढ झाली आहे. हातात येत असलेल्या लावणीच्या पिकाचे नुकसान झाले, तर लावणी कशी करणार? पावसात भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत शिरण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी शेतीचे नुकसानच होण्याची शक्यता नकारता येत नाही.झडपा बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक पेण येथील विभागीय कार्यालयात मंजुरीसाठी पाठविले असल्याचे समजते. याबाबत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेक्षण विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या वर्षी शेतीचे उत्पन्न नाहीलावणीपूर्वी खाडीला झडपा बसविणे आवश्यक होते. मात्र, ते अद्यापही न झाल्याने भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचले आहे. या खाºया पाण्यात भाताची लावणी कशी करणार? असा प्रश्न संतोष कांबळे व संतोष गोविलकर या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.