शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ लाख ३६ हजार बालकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:12 IST

भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबर पासून गोवर, रुबेला लसीकरण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबर पासून गोवर, रुबेला लसीकरण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील एकूण ७ लाख ९३ हजार ४५१ बालकांपैकी १७ टक्के म्हणजे १ लाख ३६ हजार २६२ बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त अहवालानुसार शुक्रवार, ३० नोव्हेंबर या एका दिवसात जिल्ह्यातील ३२० शाळांमध्ये लसीकरण मोहीम पूर्ण झाली आहे. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील ५३ शाळांमधील ८ हजार ५९० तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील २६७ शाळांमधील २५ हजार ३०३ विद्यार्थ्यांना अशा एकूण ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांचे लसीकरण एका दिवसांत करण्यात आले. मोहिमेच्या चार दिवसांत लसीकरण करण्यात आलेल्या एकूण १ लाख ३६ हजार २६२ विद्यार्थ्यांमध्ये ७१ हजार ४५३ मुले व ६४ हजार ८०९ मुलींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिली आहे.९ हजार ६४० लसीकरण सत्रात होणार लसीकरण. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक या दोन्ही आरोग्य यंत्रणांमार्फत हे अभियान अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अलिबाग, उरण, पनवेल, महाड, कर्जत, पेण, रोहा, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली, माथेरान या शहरी भागाच्या कार्यक्षेत्रातील १ लाख ८७ हजार ३७८ बालकांना तर ग्रामीण भागातील ६ लाख ६ हजार २०६ बालकांना अशा एकूण ७ लाख ९३ हजार ४५१ बालकांना एकूण ९ हजार ६४० लसीकरण सत्रात लसीकरण केले जाणार आहे.पहिला टप्प्यात जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ११ डिसेंबरपासून बाह्यसत्रात शाळांव्यतिरिक्त अन्य बालकांपर्यंत ही लसीकरण मोहीम पोहोचणार आहे.