शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वाहन पार्क करताय कर्जतकरांनो सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:44 IST

मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे, तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे

कर्जत : मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे, तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे, त्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत. तालुक्याचे मुख्य शहर म्हणून कर्जतची ओळख आहे. या ठिकाणी येणाºया वाहनांमुळे शहरातील रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, यावर उपाय म्हणूण कर्जत नगर परिषद, वाहतूक नियंत्रण अधिकारी (आरटीओ) आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत शहरातील पार्किंग आणि रहदारी विषयी एक आराखडा यापूर्वीच तयार केला आहे, त्यावर अंमलबजावणी सुरू होती, त्यामुळे कुठेही आणि कशीही वाहने उभी करणाºयांवर दंडात्मक कारवाई होत होती. मात्र, संबंधित ठेकादाराचा ठेका संपल्याने चार-पाच महिने कारवाई बंद होती. मात्र, ही कारवाई सोमवार, ३१ जुलैपासून सुरू होणार आहे, त्यामुळे कर्जतच्या रस्त्यावर कशीही, कुठेही वाहने उभी करणाºयांनो सावधान, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.कर्जत नगरपरिषदेच्या स्थापनेला २५ वर्षे झाली, त्याआधी कर्जत ग्रामपंचायत अस्तित्वात होती, कर्जत हे मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या रेल्वेस्थानकांच्या मधील शहर असल्याने त्याचा विकास झपाट्याने सुरू आहे. तिसरी मुंबई म्हणून आता कर्जत शहराची ओळख दिसू लागली आहे. शहराबाहेरील मुख्य रस्ते रु ंद झाले असून ते चांगले झाले आहेत, त्यावर वाढलेली रहदारी, त्यामुळे कर्जत शहरात येणारी वाहनांची संख्या त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूककोंडी हा आता कर्जतकरांचा रोजचाच त्रास झाला आहे. त्यामधून सर्वसामान्य नागरिकाला चालणे कठीण झाले आहे. कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात रु ंद झाले आहेत. मात्र, शहरातील काही इमारती या ग्रामपंचायत असताना बांधल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्यांना इमारतीखाली पार्किंग नाही आणि काही इमारती या नगरपरिषद झाल्यावर बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या इमारतीना पार्किंगची सोय न करता सर्व नियम धाब्यावर बसवून बिल्डरांनी इमारती बांधल्या आहेत. त्या इमारतींमध्ये फ्लॅट घेणाºयांना सध्या पार्किंग सोय नसल्यामुळे ते आपली मोटारसायकल असो की कार, रस्त्यावर उभी करत आहेत.शहरातील काही रस्ते तर पार्किंग झोन झाले आहेत. त्या रस्त्यांवर दिवसा जा की रात्री फेरी मारा, त्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत, ही बाब चिंताजनक आहे.बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात रु ंद झाले आहेत. मात्र, ते रु ंद झालेले रस्ते फक्त रात्रीच मोठे झालेले दिसतात. अन्यथा, दिवसा प्रत्येक दुकानदाराचे सामान आपल्या दुकानाच्या पाच-सात फूट बाहेर आलेले असते, काहींच्या दुकानाचे फलक रस्त्यावर ठेवलेले असतात आणि त्याच रस्त्यावर फेरीवाले असतात आणि त्यामध्ये एखादे वाहन आले तर वाहतूककोंडी होते. त्यामधून रस्ता शोधून पादचारी चालत असतो.