शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

रायगडमध्ये मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:33 IST

१८३ गुन्हेगारांना अटक; २,३२४ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात मतदानाकरिता मतदारांमध्ये निर्भयता यावी, कोणतेही दडपण वा प्रलोभनाला त्यांनी बळी पडू नये यासाठी विशेष पोलीस बंदोबस्ताचे नियोजन निवडणूक आचारसंहिता लागू झाली त्या दिवसापासून अमलात आणली. त्यातून रायगडमध्ये खऱ्या अर्थाने चोख निर्भय वातावरणनिर्मिती झाली असल्याचे चित्र अनुभवास येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना प्रलोभने दाखविणे, प्रसंगी मते खरेदी करण्याचा प्रयत्न करणे, ग्रामीण भागातील मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे आणि त्यातून उद्भवणाºया वादाच्या मुद्द्यांतून मारामाºया अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या रायगड जिल्ह्यातील पूर्वेतिहासाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ही विशेष पोलीस बंदोबस्त व कारवाई योजना अमलात आणली आहे.सर्वसाधारणपणे मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून करण्यात येते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आचारसंहितेच्या कालावधीत केलेल्या २६९ विविध गुन्ह्यांमध्ये एकूण १८३ गुन्हेगारांना अटक केली आहे. गेल्या तीन ते चार निवडणुकांच्या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते आणि अशांपैकी ज्या व्यक्तीवर पुन्हा गुन्हे दाखल आहेत अशा २ हजार ३२४ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध पथके बारकाईने लक्ष ठेवून असून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रायगड पोलीस यांनी केलेल्या कारवाईत तब्बल ३५ लाख ५२ हजार ४८९ रुपये किमतीची १ लाख ९ हजार ९६६ लीटर दारू जप्त करण्यात आली आहे, तर रायगड पोलिसांकडून १३ लाखांचा दारूनिर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ५ लाख २९ हजार रु पये रोख रक्कम आणि ४४ लाखांचे सोने पकडण्यात आले आहे. ८ लाख २० हजार ५०० रु पये किमतीच्या तलवारी व सुºया जप्त करण्यात आल्या आहेत. ५८ लाखांचा बेकायदा गुटखा पकडण्यात आला तर २० लाख ३५ हजार ९०६ रु पये किमतीची वाहने जप्त केली आहेत.११ व्यक्तींवर मुंबई पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे, तर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ७ अदखलपात्र आणि २ दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्जमंगळवारी होणाºया लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रि येस कोणतेही गालबोट लागू नये आणि मतदान प्रक्रिया शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त तैनात केला आहे.१५६ पोलीस अधिकारी, २ हजार २२८ कर्मचारी, ८०० होम गार्ड, ९० दंगा प्रतिबंध दलाचे जवान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या दोन कंपन्या, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र राखीव पोलीस उपलब्ध राहणार आहेत.२३ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणाजिल्ह्यात नियुक्त क्षेत्रीय अधिकाºयांपैकी एकूण २३ क्षेत्रीय अधिकाºयांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविण्यात आली आहे. दापोली तसेच गुहागर विधानसभा मतदारसंघातील एकूण ६८४ मतदान केंद्रासाठी ६२४ पोलीस कर्मचारी व ६० होमगार्ड यांची नियुक्ती केलेली आहे. येथील ७ ठिकाणी एकूण २१ मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड