शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

विशेष मुलांनी केलेले ‘उंदीरमामा’ आणि ‘मोदक’ पोहोचले घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:22 IST

गणपती बाप्पाचे वाहन मूषक अर्थात ‘उंदीरमामा’ आणि आवडता मेनू ‘मोदक’ यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच

अलिबाग : गणपती बाप्पाचे वाहन मूषक अर्थात ‘उंदीरमामा’ आणि आवडता मेनू ‘मोदक’ यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच; परंतु या उंदीरमामा आणि मोदकांना यंदा एक आगळा आयाम लाभला आहे.पेण येथील गतिमंद अर्थात विशेष मुलांच्या आई डे केअर शाळेतील मुलांनी शिक्षकांकडून प्रशिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात करून पेटी, तबला, सतार, ढोलक, सनई, झांज अशी विविध वाद्ये वाजविणारे मातीचे सुरेख रंगसंगतीच्या उंदीरमामांचे २२० संच आणि गणेशमूर्तींसोबतचे ९ हजार उंदीर आणि एक हजार मातीचे मोदक मोठ्या कल्पकतेने तयार केले आहेत. गणरायांच्या आगमनापूर्वी ते घरोघर पोहोचले असल्याची माहिती आई डे केअर शाळेच्या प्रमुख स्वाती मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पेण ही गणेशनिर्मिती नगरी म्हणून सर्वदूर ओळखली जाते. याच गणेशनगरीतील नामांकित गणेशमूर्तिकार दीपक समेळ आणि राजू सावंत यांनी या विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यावसायिक लाभ करून देण्याच्या हेतूनेआपल्या कारखान्यातील गणेशमूर्तींकरिता उंदीर तयार करून देण्याची मोठी आॅर्डर या विशेष मुलांना देऊन मोठे सहकार्य केले असल्याचे मोहिते यांनी पुढे सांगितले.यंदा प्रथमच आमच्या विशेष मुलांनी विविध वाद्ये वाजविणारे मातीचे सुरेख रंगसंगतीच्या उंदीरमामांचे संच तयार केले आणि या उंदीरमामांनी खुल्या बाजारात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि सर्व संचांची विक्री अल्पावधीत झाली, यामुळे आमची मुले सुखावून गेली असल्याचे मोहिते यांनी अखेरीस सांगितले.>मुलांना गवसला आत्मविश्वासगणपती हे सर्वांचेच आराध्य दैवत आणि त्याच्याकरिता उंदीर आणि मोदक आम्ही तयार करतो याचा मोठा आनंद आणि त्यातून आगळी स्फूर्ती या विशेष मुलांना मिळते. इतकेच नव्हे तर या उंदीर-मोदक निर्मितीतून आम्हाला मानधन मिळते, आम्ही आमच्याकडील कौशल्य वापरून पैसे मिळवू शकतो, असा स्वयंपूर्णतेचा आगळा आत्मविश्वास आमच्या विशेष मुलांना गवसला तर आमची विशेष मुले आता मानधन मिळवतात आणि पैसे घरी देतात. या प्रक्रियेतून पालकांमध्ये देखील आपल्या विशेष मुलांच्याबाबतची आत्मीयता आणि आदर वृद्धिंगत होत असल्याचे मोहिते यांनी पुढे सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव