शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेले पीपीई किट उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:52 IST

नेरळ-कर्जत मार्गावरील घटना : नागरिकांकडून संबंधितावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : कोरोनाचे संकट एकीकडे असताना, दवाखान्यात वापरण्यात येणारे पीपीई किट (जैविक कचरा) चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकले जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असताना कर्जत-कल्याण मार्गाला लागून असणाºया वृद्धाआश्रमाजवळील रस्त्यावर कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना, वापरत येत असलेले संपूर्ण पीपीई किट, मास्क हे रस्त्याच्या बाजूला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसभर घरात राहिल्याने शरीराची हालचाल होत नसल्याने, अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या भागात येत असतात. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी शुद्ध हवा व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला आहे. पीपीई किट आढळून आलेल्या रस्त्याला लागूनच असलेल्या वृद्धाश्रमात काही दिवसांपूर्वी बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली. यामुळे चिंतेचे वातावरण असताना, अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला उघड्यावर वापरलेले पीपीई किट आढळून आल्याने नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.नक्की हा कचरा कोणी टाकला, हे जरी माहित नसले, तरी अशा पद्धतीत हा कचरा कुठेही सार्वजनिक ठिकाणी सापडून येत असल्याने, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत व एकूणच प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण होत आहे.भीतीचे वातावरणच्डॉक्टर, परिचारिका व स्वचछता कर्मचारी, वाहनचालक यांना वापरण्यात येणाºया पीपीई किट, तसेच अन्य जैविक कचरा हा एका विशिष्ट पद्धतीने नष्ट करावा लागतो किंवा काही संस्थांमार्फंत हा कचरा उचलून नेला जातो, परंतु रविवारी सकाळी या भागात हा जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून बेजबाबदार वागणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.