शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’साठी आमदार निधीचा वापर

By admin | Updated: July 12, 2015 22:24 IST

राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईमध्ये पुरेशी स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

नवी मुंबई : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईमध्ये पुरेशी स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांसाठी एकही मोफत स्वच्छतागृह नाही. ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आमदार निधीतून शहरात ३० स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते. महापालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट सिटीपासून स्वच्छतेसाठी पुरस्कार घेणाऱ्या शहरातील हजारो नागरिकांना आजही उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पामबीच रोड, सायन -पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोडवर एकही स्वच्छतागृह नाही. महापालिकेच्या प्रभाग १ मध्ये पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांसाठी फक्त एकच स्वच्छतागृह आहे. नवी मुंबईचे मरिन ड्राइव्ह समजल्या जाणाऱ्या पामबीच तसे उच्चभ्रूंची वस्ती सीवूड्सारख्या भागात एकही स्वच्छतागृह नाही. झोपडपट्टीमधील रहिवाशांची संख्या व प्रसाधनगृहांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. शहरात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. सामाजिक संघटनांनी महिलांसाठी मोफत स्वच्छतागृह असावे यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरही प्रसाधनगृहांची आवश्यकता असल्याची मागणी नागरिक व लोकप्रतिनिधी करत असतात. परंतु महापालिकेस अद्याप निर्मल शहर करण्यास यश मिळालेले नाही. शहरातील गैरसोय दूर करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. नवी मुंबईमध्ये २ कोटी रूपयांचा आमदार निधी खर्च करून ३० स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक पद्धतीने गरजेच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. प्रत्येक नोडमध्ये व महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेस दिल्या आहेत. (प्रतिनिधी)