शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात निकृष्ट तेलाचा वापर

By admin | Updated: September 28, 2016 02:50 IST

शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्जत तालुक्यामधील शाळांमध्ये निकृष्ट व मुदत संपलेल्या

- कांता हाबळे,  नेरळशालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्जत तालुक्यामधील शाळांमध्ये निकृष्ट व मुदत संपलेल्या तेलाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नेरळमधील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेतील व्यवस्थापन समितीने उघड केला आहे. अशा प्रकारे निकृष्ट, मुदत संपलेली तेलाची पाकिटे देऊन शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. या घटनेचा पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून नेरळ पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.शालेय पोषण आहारावरून राज्यात अनेकदा वाद झाले आहेत. आता त्यात नेरळ उर्दू शाळेची भर पडली आहे. या शाळेत पुरवठा करण्यात आलेल्या तेलाच्या पाकिटांमध्ये २८ पैकी १८ पाकिटे ही मुदत संपलेली आढळून आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे काही मुले दगावली होती. कर्जतमधील खांडस हा आदिवासी भागही कुपोषणाच्या विळख्यात अडकला आहे. कुपोषण दूर व्हावे, यासाठी सरकारकडून राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र पोषण आहाराचा दर्जा आणि वाटपात घोळ होत असल्याची प्रकरणे वारंवार उघड होत आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत असून याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय पोषण आहारासंदर्भात गटशिक्षण अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्याचा अहवाल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना त्वरित पाठवण्यात येईल.- एम. एन. म्हात्रे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समितीजिल्ह्यातील पोषण आहार योजनेवर समिती नेमून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी.- युसूफ सय्यद, अध्यक्ष, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती, नेरळ