जव्हार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला तसेच हिंदू-मुस्लिम समाजांचे श्रद्धास्थान असलेला जव्हारचा उरूस ३, ४ आणि ५ आॅक्टोबरला होणार आहे. यंदाही उरुसाची जय्यत तयारी सुरू झाली असून एसटी स्टॅण्डच्या ग्राउंडवर विविध पाळणे आणि अन्य दुकाने मांडण्यास सुरुवात झाली आहे. एसटी स्टॅण्डच्या ग्राउंडवर पावसामुळे नेहमी चिखल होत असे. त्यामुळे उरुसाला येणाऱ्या लोकांना खूपच त्रास होत होता. उरूस जलसा कमिटीचे अध्यक्ष अनिस पठाण यांनी नगरपालिकेला लवकरात लवकर रस्ता तयार करून माती-मुरुमाचा भराव करण्यास सांगितले होते. या मागणीनुसार नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदीप वैद्य आणि पालिका मुख्याधिकारी वैभव विधाते, अभियंता बी.डी. क्षीरसागर यांनी तातडीने मजूर लावून संपूर्ण ग्राउंड स्वच्छ केले. (वार्ताहर)
जव्हारमध्ये उरुसाची जय्यत तयारी
By admin | Updated: October 1, 2015 23:31 IST