शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उरी - द सर्जिकल स्ट्राइक : भारतीय सैन्याची ऐतिहासिक शौर्यगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 03:57 IST

‘‘आज तक हमारी सहनशीलता को हमारी कमजोरी समझा जाता था, मगर अब नहीं... ये नया हिन्दुस्तान है.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहताना तुम्हाला देशभक्तीचा कुठेही अतिरेक झालेला जाणवणार नाही. हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.

‘‘आज तक हमारी सहनशीलता को हमारी कमजोरी समझा जाता था, मगर अब नहीं... ये नया हिन्दुस्तान है. ये हिन्दुस्तान घर में घुसेगा भी.. और मारेगा भी..’’ अशा प्रकारच्या दमदार डायलॉगने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाला सुरुवात होते. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल) आणि कॅप्टन करण कश्यप यांच्या मणिपूरमधील कॅम्पवर दहशतवादी हल्ला करतात. त्याला ते चोख उत्तरदेखील देतात. विहानची आई (स्वरूप संपत) अल्झायमरने ग्रस्त असते. त्यामुळे तो बॉर्डरवरून दिल्लीत पोस्टिंग घेतो. त्याच दरम्यान उरीमध्ये दहशतवादी भ्याड हल्ला करतात. या हल्ल्यात विहानचा जिवलग मित्र आणि बहिणीचा पती करण कश्यप शहीद होतो. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत ‘सर्जिकल स्ट्राइक’ करायचे ठरवतो. या मोहिमेची आखणी आणि नेतृत्व विहान करतो. ही मोहीम तो कशा प्रकारे यशस्वी करतो हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राइकच्या १० दिवसांतील चित्तथरारक घटना मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटल्या असून, हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सिनेमात विकी कौशलने आर्मी आॅफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते. तर यामी गौतमच्या वाटेलाछोटी भूमिका आली आहे; तिने मात्र या भूमिकेला योग्य न्याय दिलाआहे.परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका छोट्या - छोट्या असल्या तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेकवेळा सर्जिकल स्ट्राइकबाबत वाचलेय किंवा ऐकलेय; मात्र ही संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरते. हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच पाहावा लागेल.हिंदी चित्रपटगीतांजली आंब्रे

टॅग्स :StrikeसंपMumbaiमुंबईUri Movieउरी