शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यावरील अनावश्यक बांधकामास हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:36 IST

कर्जत नगरपरिषद हद्दीतील करमरकर यांच्या घरापासून ते मुद्रे येथील हायवेपर्यंत कृषी संशोधन केंद्राचे बाजूने सुमारे ५ कोटी रु पये खर्च करून बंदिस्त नाला व त्यावर रस्ता बांधण्यात येणार होता.

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील करमरकर यांच्या घरापासून ते मुद्रे येथील हायवेपर्यंत कृषी संशोधन केंद्राचे बाजूने सुमारे ५ कोटी रु पये खर्च करून बंदिस्त नाला व त्यावर रस्ता बांधण्यात येणार होता. असे निर्जन स्थळी नागरिकांकडून कोणतीही मागणी नसताना विकासकाम करण्याचा घाट कर्जत नगरपरिषदेने घातला आहे. मात्र त्याबाबत वकील ॠषिकेश जोशी यांनी हरकत घेतल्याने नाल्याच्या बांधकामास कृषी संशोधन केंद्राकडून हरकत घेण्यात आली आहे.विठ्ठलनगर परिसरातील करमरकर यांचे घरापासून कृषी संशोधन केंद्रातून नदीपर्यंत जाणाऱ्या नाल्याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्णमधून नगरपरिषद करत आहे. या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नगरपरिषद शासकीय निर्देश विचारात घेत नसल्याने सुमारे ६५ लाख रु पये खर्च करून दिवाणी न्यायालयाच्या आवारातील बाजूला असलेला रस्ता धूळ खात पडला आहे. हे बाब लक्षात घेत कर्जतमधील वकील ॠषिकेश जोशी यांनी नाल्याच्या कामाबाबत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व राज्याचे राज्यपाल यांना ईमेल करून नाल्याचे बांधकाम व त्यावरील रस्त्यास हरकत घेतली आहे.कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संशोधन प्रकल्प सुरू असून या क्षेत्रात कोणतेही अकृषिक काम करण्यात येऊ नये असे शासकीय निर्देश महाराष्ट्र शासनाने काढले आहेत. त्याकडे नगरपरिषदमधील बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे, असे जोशी यांनी सांगितले. तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जमिनीवर आणि पिकावर  काँक्रीटीकरणामुळे पाणी तुंबून परिणाम होऊ शकतो याबाबत चिंता व्यक्त केली होती. जोशी यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधक संचालक यांनी या कामाबाबत हरकत घेतली आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावरून वाहणाºया मुख्य नाल्याचे काम अर्धवट आहे, मग ज्याची गरज नाही तो नाला बांधण्याची घाई का?- ऋषिकेश जोशी, वकील

टॅग्स :Raigadरायगड