शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये सभापतींचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:59 IST

पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही. त्याचबरोबर सभापतींना बसण्याकरिता केबिन नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि महापालिकेच्या नवीन इमारतीच्या जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासनाने संदर्भासहित स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढल्याने आंदोलनाची हवाच निघून गेली.पनवेल महानगरपालिका नव्याने निर्माण झाली असल्याने काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपुरी जागा ही सुध्दा मोठी अडचण ठरू लागली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत पदाधिकाºयांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन सात केबिन तयार असून उर्वरित तीन सभापतींना उपायुक्त, सहायक आयुक्त आणि लेखाधिकाºयांची केबिन खाली करून देण्याची तयारी दर्शवली आहे.निवडणुकीच्या प्रक्रि येत मोठ्या प्रमाणात कालावधी खर्च पडला त्याचबरोबर मोठे काम असल्याने त्याकरिता मर्यादा आली, म्हणून केबिनच्या कामाला काही प्रमाणात विलंब लागला. परंतु त्याकरिता कमीत कमी सहा महिन्याची मुदत आवश्यक असल्याचा मुद्दा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सभापतींनी सोमवारी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर ठिय्या मांडला.त्यामध्ये प्रकाश बिनेदार, विद्या गायकवाड, दर्शना भोईर. डॉ. अरुण भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, विकास घरत यांचा समावेश होता. सभापतींची निवड होवून एक महिना उलटला तरी दालन मिळाले नसल्याचे प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. आम्हाला प्रशासन विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, शहर अभियंता संजय कटेकर, डॉ. भगवान खाडे यांनी सभापतींना वरती येण्याची विनंती केली. त्याचबरोबर नवीन चार आणि अधिकाºयांची तीन अशी दालने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला.उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी मिटिंग हॉलमध्ये बसून आपले कामकाज करण्याची तयारी दर्शवली. परंतु आम्हाला आश्वासन देवूनही नवीन दालने का उपलब्ध करूनदिली नाहीत हा मुद्दा सभापतींनी लावून धरला. सर्व नगरसेवक माऊंटअबू या ठिकाणी अभ्यास दौºयावर चालले असल्याने आता तूर्तास तरी दालनाबाबत अशी भूमिका घ्यायला नको होती, ही खंत लेंगरेकर आणि बावनकुळे यांनी व्यक्त केली.