शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Updated: October 19, 2015 01:26 IST

मांडवा बंदर येथे खाजगी करणातून सुरु करण्यात येणाऱ्या कुल कार सेवेमुळे स्थानिकांचा रोजगार बुडून सुमारे ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागमांडवा बंदर येथे खाजगी करणातून सुरु करण्यात येणाऱ्या कुल कार सेवेमुळे स्थानिकांचा रोजगार बुडून सुमारे ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात दंड थोपटल्या शिवाय पर्याय नसल्याने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, अशी माहिती मांडवा बंदर बचाव संर्घष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी लोकमतशी बोलताना दिली.रविवारी या खाजगी सेवेचा शुभारंभ होणार होता. मात्र तो होऊ शकला नाही. यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागणे ही आमचा रोजगार बुडविणाऱ्यांची हार असल्याचे भोईर यांनी सांगितले. ग्रामिण भागाला देशाच्या आर्थिक राजधानीला जोडण्याचे महत्वपूर्ण काम मांडवा बंदर करते. याच परिसरात बलाढ्य उद्योजक, सेलिब्रिटज् यांचे अलिशान बंगले आहेत.अलिबाग सारख्या छोट्या शहराचे अर्थकारण बदलण्यास मांडवा आणि रेवस बंदराचा मोठा वाटा आहे.मुंबईतून समुद्र मार्गे अलिबागला येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मांडवा बंदराचे नव्याने विस्तारीकरण करण्यात आल्यानंतर यामध्ये वेगाने वाढ होत आहे. रेवस बंदरमार्गे येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक समुद्रमार्गेच अलिबागला येणे पसंत करतात. अलिबागमधून इतर पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी चांगली कन्केटीव्हीटी असल्याने हा मार्ग सुखकर आणि जलद म्हणून ओळखला जातो.गेल्या २० वर्षापासून विक्रम-मिनीडोर रिक्षा बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेसाठी येथे हजर असतात. मांडवा आणि रेवस परिसरामध्ये सुमारे ५०० विक्रम-मिनीडोर चालक मालक आहेत.पर्यटन व्यवसायात वाढ होण्यासाठी पर्यटकांना जास्तीत जास्त उच्च दर्जांच्या सेवा देणे गरजेचे आहे. यासाठी मेरीटाईम बोर्डाने निवादा मागवून खाजगी करणातून मांडवा बंदरावर येणाऱ्यांसाठी कुलकार सेवा देण्याचे ठरविले आहे. लि बिल्स कन्व्हेनियन्ट हॉटेल्स् अ‍ॅण्ड रिसॉर्ट लि.ही सेवा सुरु करणार असल्याने स्थानिक विक्रीम-मिनीडोर रिक्षा चालक-मालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. रोजगार हरपल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मांडवा बंदर बचाव संर्घष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सांगितले.>> स्थानिकांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार असल्याचे मांडवा बंदर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर म्हणाले. याबाबत मेरीटाईम बोर्डाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. स्थानिकांच्या प्रश्नावर शेकाप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टीने आंदोलनाला पाठींबा दर्शविला असल्याचेही भोईर यांनी सांगितले. स्थानिकांचा रोजगार बुडणार नाही यांची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. निविदा काढताना परस्पर निविदा काढण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. मात्र, प्रशासन आणि सरकारी पातळीवर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.