शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा येथे अनधिकृत मोबाइल टॉवर; नगरपंचायतीकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:04 IST

रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने विरोध

- उदय कळस म्हसळा : शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या समोर भर वस्तीमध्ये मोबाइलच्या अनधिकृत टॉवरचे काम जोमाने सुरू आहे. या मोबाइल टॉवर बांधणीच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी म्हसळा नगरपंचायतीमध्ये तक्रार अर्ज देऊनही हे काम सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारीला नगरपंचायतीने केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास येत आहे.म्हसळा पोलीस ठाण्याच्या समोर डॉ. ए. के. जलाल यांच्या मालकीच्या इमारतीवर दोन वर्षांपूर्वी एका मोबाइल टॉवरचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु मोबाइल टॉवरमुळे होणाऱ्या रेडिएशनचा मनुष्याच्या आरोग्यावर होणाºया दुष्परिणामाची जाणीव झालेल्या या परिसरातील सुजाण नागरिकांनी या अनधिकृत मोबाइल टॉवरविरोधात म्हसळा नगरपंचायतीमध्ये शेकडो नागरिकांच्या सह्यांनिशी तक्रार अर्ज दिला होता; त्यानुसार काही काळापुरते या टॉवरचे काम बंद होते. परंतु या मोबाइल टॉवर बांधणीचा कंत्राटदार बरोबर सुट्टीच्या दिवशी काम सुरू ठेवत असे. त्याप्रमाणे या मोबाइल टॉवरचे काम जवळजवळ पूर्णत्वास गेलेले दिसत आहे. तरीही म्हसळा नगरपंचायत प्रशासन या टॉवरवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे, असे या तक्रारदारांपैकी एक अनिकेत पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जर या टॉवरचे काम बंद करून हा मोबाइलचा टॉवर म्हसळा शहरातून हद्दपार करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा अनिकेत पानसरे, जहूर हुर्जुक व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपंचायतीला दिला आहे.मोबाइल टॉवरमधून उच्च प्रतीच्या लहरी निघतात. त्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्या लहरींचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो असे सांगितले जाते. सोबतच पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो. टॉवर उभारण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत; मात्र या नियमांना धाब्यावर बसवून टॉवरचे काम सुरू आहे. तरी ते त्वरित बंद करण्यात यावे.- अनिकेत पानसरे, तक्रारदारम्हसळा नगरपंचायतीने टॉवर बंद करण्यास सांगितले आहे. बंद न केल्यास संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- मनोज उकिर्डे, मुख्याधिकारी, नगरपंचायतटॉवर काम करणाºया संबंधितांना नगरपंचायतीने तोंडी सांगूनदेखील थांबविले नाही. त्यांना नगरपंचायत नोटीस देईल व नोटीस देऊन काम थांबले नाही, तर त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करू. वेळ आल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.- जयश्री कापरे, नगराध्यक्ष, नगरपंचायत म्हसळा

टॅग्स :Mobileमोबाइल