शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने जि. परिषदेला खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:12 IST

माहिती अधिकार कार्यकर्त्यांची व्यक्तिगत माहिती गोळा करत बसण्यापेक्षा, रायगड जिल्हा परिषदेने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर का दिले नाही?

अलिबाग : माहिती अधिकार कार्यकर्त्यांची व्यक्तिगत माहिती गोळा करत बसण्यापेक्षा, रायगड जिल्हा परिषदेने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर का दिले नाही? असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. त्यामुळे याचिकाकर्त्यांची व्यक्तिगत माहिती गोळा करत बसणाºया जिल्हा परिषद प्रशासनाला झटका लागला. याबाबतची माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते मिलिंद रमेश पाटील यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायतीत अनियमितता झाल्याचे जिल्हा परिषदेच्या आॅडिट रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तीन महिन्यांच्या आत चौकशी करावी आणि पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. हा आदेश माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी मैलाचा दगड ठरणारा असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात मिलिंद पाटील यांनी अ‍ॅड. मिलिंद इंगोले यांच्यामार्फत जनहित याचिका केली होती. मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायतीत विविध प्रकारची कंत्राटे ही निविदा न मागवताच वेगवेगळ्या लोकांना दिली जात असल्याचा दावा मिलिंद पाटील यांनी केला होता. संशयास्पद पद्धतीने देण्यात येत असलेल्या अशा कंत्राटांमुळे ग्रामपंचायतीच्या निधीचे नुकसान होत आहे. खुद्द जिल्हा परिषदेनेही २००७-०८, २००८-०९ व २००९-१० या आर्थिक वर्षाच्या अंतर्गत आॅडिटिंगमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता आढळल्याची माहिती माहितीच्या अधिकारात दिली होती.