खोपोली : शहरातील इंडिया स्टील कारखान्यामध्ये सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.या स्फोटामध्ये दिनेश चव्हाण (५५, रा. लक्ष्मीनगर, खोपोली) व प्रमोद शर्मा (३०, रा. सुभाषनगर, खोपोली) यांचा मृत्यू झाला असून, सुभाष वांजळे (५५, रा. वरची खोपोली) हे गंभीर जखमी झाले.मध्यरात्री एकच्या सुमारास झालेल्या या स्फोटाचा आवाज एक किलोमीटर परिसरात ऐकायला आला. यामुळे अनेक घरांना हादरे बसले. स्फोट एवढा जबरदस्त होता की, मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या. जखमींना नवी मुंबईच्या रुग्णालयात हलविले आहे. स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजले नाही. इंडिया स्टील कारखान्यात यापूर्वीही अनेकदा स्फोट झाले आहेत.
खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 02:45 IST