शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हातचलाखीने दोन महिलांचे दागिने लंपास

By admin | Updated: May 26, 2017 00:18 IST

महिलांशी गोडगोड बोलत, त्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास करणारी टोळीच सध्या रायगड जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : महिलांशी गोडगोड बोलत, त्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास करणारी टोळीच सध्या रायगड जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. मात्र, सातत्याने चोरटे फरार होण्यात यशस्वी होत आहेत. अशाच प्रकारे बुधवारी माणगाव आणि पालीमध्ये दिवसाढवळ््या अशा घटना घडल्या आहेत.बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाली-सुधागड तालुक्यातील झाप या गावी एक महिला खेळण्यांच्या दुकानात असताना, एक अनोळखी माणूस तेथे आला. त्याने एक बाहुली व एक गाडी खरेदी केली. त्यानंतर दुकानदार महिलेचा विश्वास संपादन करून, ‘माझ्या नवीन सोन्याच्या दुकानाचे उद्घाटन करायचे असल्याने आणि ते सुस्थितीत चालण्यासाठी हा फुलांचा हार सुहासिनीच्या हातून पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपतीला दान करा’ अशी बतावणी केली. त्याच दरम्यान दुकानदार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हातचलाखीने काढून, १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मंगळसुत्रासह फरार झाला. दुकानदार महिलेच्या माहितीनुसार पाली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे एक महिला त्यांच्या दुकानात काम करीत असताना, एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला. त्याने त्याच्या हातातील पिशवी दुकानदार महिलेस देऊन, ‘मला गुप्तदान करायचे आहे, ही पिशवी घ्या. मी गेल्यावर गणपती मंदिरात ते तुम्ही दान करा.’ असे दुकानदार महिलेस बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील सोन्याची अंगठी, असा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा ऐवज हातचलाखीने काढून घेऊन चोरटा फरार झाला आहे. या प्रकरणीदेखील दुकानदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहवा एस. पी. पाटील हे करीत आहेत.