लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत-कल्याण राज्य महामार्गावर बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास नेरळ शहरातील माथेरान प्रवेशद्वारासमोरून येणाऱ्या दुचाकीने अचानक पेट घेतला. ही गोष्ट तिथे असलेल्या प्रवासी व नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चालक व त्याचा साथीदार बचावला आहे.नेरळ शहरातील माथेरान प्रवेशद्वाराजवळ ही आग लागली. दुचाकी नंबर एम.एच.०६ ए.एम. २३४ ही गाडी भरधाव वेगाने जात असताना अचानक पेट घेतला. तेथील नागरिकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दुचाकी चालकाला व मागे बसलेल्या साथीदाराला नागरिकांनी गाडीला आग लागल्याचे ओरडून सांगितल्याने, चालक बंटी पाटील आणि साथीदाराने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पळ काढला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे व मदतीने जीवितहानी टळली. हे दुचाकी चालक माजगाव आंबिवली खोपोली येथील राहणारे असून ते लग्नपत्रिका वाटण्यासाठी नेरळ येथे आले होते. हा प्रकार घरी परतात असताना घडला. परंतु या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धावती दुचाकी पेटली
By admin | Updated: May 12, 2017 01:55 IST