शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

मदतकार्य करताना एनडीआरएफच्या जवानाच्या पायाची दोन बोटे तुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:20 IST

श्रीवर्धन येथे मदतकार्य करताना झाला अपघात । श्रीवर्धन-मुंबई असा उभारला ग्रीन कॉरिडॉर

आविष्कार देसाई ।अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये हाहाकार उडवत प्रचंड नुकसान केले आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपत्तीनंतरच्या कामांना गती देण्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे इंद्रजीत सिंह चव्हाण हे काम करताना जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटली आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी आपत्तीपश्चात मदतकार्याला वेगाने सुरुवात केली आहे.शनिवारी सकाळी आपत्ती दलामार्फत श्रीवर्धन तालुक्यात मदतकार्य सुरू होते. यातील जवान इंद्रजीत सिंह चव्हाण हे मदतकार्य करत असताना त्यांना अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटून पडली. त्यांना तातडीने श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातडीने मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु श्रीवर्धन ते मुंबई हे अंतर तब्बल १८८ किमीचे होते. त्यासाठी किमान सहा तास लागणार होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना केल्या. यासाठी रायगड पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. चव्हाण यांच्या रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस वाहन पायलेटिंगकरिता दिले. रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचणे त्यांना शक्य झाले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी दिली.नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालयश्रीवर्धन येथून चव्हाण यांना नागोठणेपर्यंत आणले. त्यानंतर नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालय असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे १०० किमीचे अंतर फक्त सव्वा तासात पार करणे शक्य झाले. एरवी हेच अंतर पार करण्यासाठी किमान तीन ते सव्वातीन तासांचा अवधी लागतो.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग