शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाऱ्या दोघा ओला चालकांना पेणमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:44 IST

दिवसा ओला चालक तर रात्री बँका व पतपेढ्यांमध्ये घरफोड्या करून ऐवज लंपास करणा-या ओला चालक भूषण पवार आणि विनोद देवकर या दोघांना अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे.

- जयंत धुळप अलिबाग : दिवसा ओला चालक तर रात्री बँका व पतपेढ्यांमध्ये घरफोड्या करून ऐवज लंपास करणा-या ओला चालक भूषण पवार आणि विनोद देवकर या दोघांना अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयाने २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे ओला सेवेच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.ओलाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी बँका व पतसंस्थांमध्ये अनेक चोºया केल्या असून, बुधवारी रात्री ते पेण न्यायालयात चोरी करण्याकरिता ओलाने येणार असल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्या ओला टॅक्सीची तपासणी केली असता दोन लोखंडी कटावण्या, हॅक्सॉब्लेड, दोन स्क्रू ड्रायव्हर आदी घरफोडीची हत्यारे मिळाली. तपासात दोघांनी वडखळ, पोलादपूर येथील दाखल गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात अलिबाग, नागाव येथील दोन बंगल्यांचे कुलूप, रसायनी व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील मायक्र ो फायनान्सचे आॅफिस, खेडमधील एच.पी. गॅसचे आॅफिस, टीव्ही शोरूम, दापोली येथील टीव्ही शोरूम, कल्याणयेथील पतपेढीच्या तसेच आचरा, सिंधुदुर्ग येथील तीन बंगल्यांचे कुलूप तोडून चोरी केल्याची व इतरठिकाणी चोरी व घरफोडीकरण्याचा प्रयत्न केल्याचीकबुली दिली. एकूण ११ गुन्ह्यांप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.>कोकणातील गुन्ह्याचीही उकल!भूषण मूळचा दापोलीचा आहे, तर विनोद मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील असून, २००९ पासून त्यांच्यावर मुंबईत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विनोदची बालगुन्हेगार म्हणून नोंद आहे. घरफोड्या केल्याप्रकरणी वडखळ, पोलादपूर आणि अलिबाग पोलीसांत गुन्हे दाखल आहेत. दोघांनाही प्रथम वडखळ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक केले असून त्यांच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्ह्यांचीही उकल होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड