शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरमध्ये दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:56 IST

पोलादपूर : बांधकाम साहित्याचे पैसे देण्या-घेण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलादपूरमध्ये घडली आहे.

पोलादपूर : बांधकाम साहित्याचे पैसे देण्या-घेण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलादपूरमध्ये घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटांतील ११ जण जखमी झाले असून, एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. परस्परविरोधी तक्रारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील हनुमाननगरमधील अंकुश पवार (४०) मटेरियल सप्लायर्स यांनी संजय जाधव याच्याकडे बांधकाम साहित्याचे पैसे मागितल्याने त्यांच्या रागातून संजय जाधव याने राकेश चव्हाण, स्वप्निल जाधव, शुभम जाधव, संतोष चव्हाण, संदेश चव्हाण, मुन्ना चव्हाण, मधुकर जाधव आदींना सोबत घेऊन संगनमताने अंकुश पवार यांची मुले अनिकेत व प्रथमेश यांची मोटारसायकल अडवून त्यांना तसेच अंकुश पवार, विकास पवार, विलास पवार, अर्जुन पवार, लहू पवार, शकुंतला पवार यांना शिवीगाळी, दमदाटी करून प्रसंगी वीट फेकून मारीत, मारहाण करून जखमी केले.या हाणामारीत ७ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. या प्रकरणी अंकुश पवार यांनी प्रथम पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.दुसºया गटातील संजय जाधव (२७, कॉन्ट्रक्टर, रा. हनुमाननगर, पोलादपूर) याने पहिल्या गटाच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विकास पवार, अंकुश पवार, लहू पवार, प्रथमेश पवार, अनिकेत पवार, अभिषेक पवार तसेच अर्जुन पवार, विलास पवार, बाळू पवार अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.प्रसंगी सर्व आरोपी अटकेत असल्याचे पोलिसांनी सांगून झालेल्या मारहाणीत संदेश चव्हाण, राकेश चव्हाण, आई शोभा, आत्या मंगल असे चार जण जखमी झाले. त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास रोहा येथील डीवायएसपी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार हे करीतआहेत.

टॅग्स :Raigadरायगड