शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किहीम येथे दोन लहानग्यांचा झोपेत मृत्यू

By निखिल म्हात्रे | Updated: April 1, 2024 18:17 IST

आराध्या संदानंद पोळे (६ वर्षे) व सार्थक संदानंद पोळे (३ वर्षे) या अशी मृत पावलेल्या दोन भावंडांची नाव आहेत.

अलिबाग - किहीम आदिवासी वाडी येथे दुपारी झोपलेल्या दोन भावांचा अचानक मृत्यु झाला आहे. याबाबत मांडवा पोलिसांनी आकस्मात मृत्यु म्हणून नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत. आराध्या संदानंद पोळे (६ वर्षे) व सार्थक संदानंद पोळे (३ वर्षे) या अशी मृत पावलेल्या दोन भावंडांची नाव आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शीतल सदानंद पोळे, सदानंद नामदेव पोळे हे आपल्या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत एक वर्षांपासून काम करत आहेत. रविवारी दुपारी जेवल्यानंतर आराध्या व सार्थक हे झोपले होते. सायंकाळी झोपेतून उठत नाही म्हणून त्यांना उठविण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता ती दोन्ही मुल बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत घोषित केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात शीतल सदानंद पोळे व सदानंद नामदेव पोळे यांचे नातेवाईकांनी गर्दी केली होती.

याप्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.रात्री उशिरापर्यंत अधिक चौकशी करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात घेऊन जात सोमवार शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले, या मुलांचे अंतिम विधी करण्यासाठी त्यांच्या मूळगावी पुसद- यवतमाळ येथे घेऊन गेले आहेत. याबाबत जे.जे. रुग्णालय यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे  सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग