शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकरांत १० टन कलिंगडे

By admin | Updated: March 10, 2017 03:37 IST

तालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे.

- विजय मांडे,  कर्जततालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे. त्यांनी आपल्या दोन एकर शेतीतून चक्क १० टन कलिंगडे पिकविली आणि तिप्पट नफा कमविला आहे.कर्जतच्या पूर्व भागातील विकासाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या राजनाला कालव्याच्या पाण्याने अनेकांना घडविले आहे. भाताचे विक्र मी उत्पादन घेणारे शेकडो शेतकरी कर्जत तालुक्यात आहेत. त्यातील वदप येथील विनय वेखंडे हे एक मोठे नाव. वर्षानुवर्षे भाताचे पीक घेणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना राजनाला कालवा बंद झाला आणि वेगळा विचार करायला भाग पाडले. अनेक शेतकऱ्यांनी राजनाला कालव्याचे पाणी बंद असल्याने भाजीपाला, कडधान्य यांची म्हणजे कमी पाण्यावर होणारी शेती केली. वेखंडे यांनी आपल्या शेतीपैकी पाच एकर जमिनीवर मागील तीन वर्षे भाजीपाला शेती केली. त्यात नफा झाला, पण समाधानकारक शेती करता येत नसल्याने २०१६ च्या सुरु वातीला कलिंगडाचे पीक काही भागात घेण्याचा लहानसा प्रयत्न केला. मात्र यावर्षी आधुनिक पद्धतीने कलिंगडाचे पीक घेण्यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये नियोजन केले. ९० दिवसांच्या कलिंगडाचे पीक घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी वेखंडे यांनी वाफ्यांवर रोपे लावून घेतली. दोन एकर शेतीसाठी ७० हजार खर्च आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १० टन कलिंगडाचे उत्पादन वेखंडे यांनी मिळविले आहे. कर्जतच्या बाजारात तर कधी पनवेलच्या बाजारात वेखंडे यांच्या गावठी कलिंगडांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे चार किलोपासून पुढे वजन असलेली कलिंगडे वेखंडे यांच्या शेतात लावली होती. मुख्य म्हणजे यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सवात त्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्र ी केली असून झालेल्या खर्चाच्या तिप्पट नफा मिळविला आहे. वेखंडे यांच्या कलिंगडाचे १० टनाहून अधिक उत्पादनाची चर्चा असून असंख्य शेतकरी कलिंगडाचे पीक पाहण्यासाठी वदप गावातील शेताला भेट देत आहेत.शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्याने आणि आधुनिक पद्धत स्वीकारत असताना योग्य नियोजन केल्याने चांगले पीक आले. दोन एकरमध्ये १० टन कलिंगडाचे उत्पन्न आल्याने नफा झाला आहे.-विनय वेखंडे, शेतकरी