शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास कार्यक्रम अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:45 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची

आविष्कार देसाई अलिबाग : मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिबिरामध्ये सरकारी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने चांगलीच अडचण निर्माण होत आहे. वेळ निभावून नेण्यासाठी लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्याची वेळ आयोजकांवर येते.तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच सुधागड तालुक्यातील मानवाचा विकास साधला जाणार का, हा मोठा प्रश्न आहे.यातून मार्ग काढण्यासाठी आता आरोग्य प्रशासन रायगड मेडिकल असोसिएशनची मदत घेणार आहे. याबाबत असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, असे मानण्यास काहीच हरकत नाही.मानवाच्या बळकटीकरणासाठी मानव विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्याची निवड करण्यात आली आहे.तालुक्यातील पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर मातांसह लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिर पार पडली आहेत.२०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत मानव विकास कार्यक्रमासाठी ४९ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान सरकारने देऊ केले होते. एकूण ६१ शिबिरांसाठी १० लाख ८४ हजार ५६ रुपये खर्च करण्यात आला आहे. एक हजार ८३५ गरोदर मांताच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ७५६ गरोदर मातांना बुडीत मजुरीसाठी २६ लाख ७६ हजार रुपये देण्यात आले आहेत. शिबिरामध्ये एक हजार ४७७ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सॅम/मॅम श्रेणीतील १४८ बालके आढळली.यातील गंभीर बाब म्हणजे ज्या गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. त्याचप्रमाणे लहान मुलांच्याही तज्ज्ञ डॉक्टरांचीही वानवा आहे.मानव विकास कार्यक्रमामध्ये ज्या सुधागड-पाली तालुक्याची निवड केली आहे. त्या अंतर्गत येणाऱ्या पाली आणि जांभुळपाडा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरच नसणे हे गंभीर आहे.शिबिर यशस्वी करण्यासाठी तेथील आरोग्यप्रमुखांना लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करावे लागते; परंतु हाताच्या बोटावर मोजणारेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सरकारी सेवेत आहेत.यातील दुसरी गंभीर बाब म्हणजे अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असणाºया जिल्हा सरकारी रुग्णालयात लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच मानवाचा विकास साधला जाणार का? हा प्रश्न आहे.