शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:13 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या नारायण नागू पाटील व स्व. प्रभाकर पाटील या सभागृहांमध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी होत्या.

रायगड : जिल्हा परिषदेचा ६२ काेटी पाच लाख ३५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ सभापती नीलिमा पाटील यांनी बुधवारी सभागृहात सादर केला. मागील अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पात १ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अत्यंत गरीब, शेतकरी, पददलित समाज, महिला, अपंग आणि सर्व स्तरातील घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचे नीलिमा पाटील यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा परिषदेच्या नारायण नागू पाटील व स्व. प्रभाकर पाटील या सभागृहांमध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी होत्या.

जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, जिल्हा परिषद मालकीच्या इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करुन देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे अर्थ सभापती नीलिमा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कोविड कालावधीत आरोग्य सुविधा पुरविण्यासोबत विकास तसेच विविध करांची वसुली करण्यात यश मिळाल्याने अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत जास्त घट झाली नसल्याचे स्पष्ट केले.

सभेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांनी अभिनंदनाचे तसेच दुखवट्याचे ठराव मांडले. त्यानंतर नीलिमा पाटील यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांनी स्वागत केले. तसेच या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, वित्त अधिकारी दत्तात्रेय पाथरुट यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी, पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

खर्चाची तरतूद२०२१/२२ या वर्षासाठी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी ३ कोटी ४२ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली. इमारती व दळणवळण १४ कोटी १४ लाख १४ हजार, पाटबंधारे १ कोटी २० लाख, सार्वजनिक आरोग्य २ कोटी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी १० कोटी, कृषी २ कोटी २७ लाख ५५ हजार, पशुसंवर्धन १ कोटी ३५ लाख, जंगले ५ लाख, समाजकल्याण १० कोटी, अपंगकल्याण २ कोटी ५० लाख, सामूहिक विकास महिला व बालकल्याण ५ कोटी, संकीर्ण खाती २ कोटी, संकीर्ण ६ कोटी ८ लाख ७२ हजार, निवृत्ती वेतन ६ लाख, तसेच इतर खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

२०२०-२१ चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प२०२०-२१ चा अंतिम सुधारित ८८ कोटी ८८ लाख ८८ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. मार्च २०२० मध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ६३ कोटी ६९ लाख ६७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. या मूळ अर्थसंकल्पात २५ कोटी १९ लाख २१ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.