शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धाटावमध्ये ट्रक जाळला

By admin | Updated: March 21, 2017 02:01 IST

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर उभ्या असलेल्या ट्रकला रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने

धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर उभ्या असलेल्या ट्रकला रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे ट्रक चालक-मालक वर्गाबरोबर लगतच्या वसाहत असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये ट्रकचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून या प्रकाराची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.रविवारी १९ मार्च रोजीच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अनंता सानप (रा.वरसगाव,रोहा) यांचा एम.एच.०४ ए एल ९४७३ क्र मांकाचा रिकामा ट्रक धाटाव औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यावर गेली ३ ते ४ दिवसांपासून उभा होता. मात्र या ट्रकला रविवारी अज्ञात व्यक्तींकडून आग लावून जाळण्यात आला.वीजवाहिनी पडल्याने टेम्पो खाक-रोहा : रोहा-कोलाड मार्गावरील वरसे गावाजवळ गादी, उशा वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोवर अचानक विजेची तार पडल्याने टेम्पो जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या लागलेल्या आगीमुळे रोहा शहर व वरसे परिसरातील वीजपुरवठा तब्बल चार तास खंडित झाला होता. दरम्यान, मागील पाच दिवसांत कोलाड (पुई) येथील भंगार गोडावून, रोहा खारी रोडवरील धनसे कॉम्प्लेक्समधील गादी कारखाना तर वरसे येथील ही तिसरी घटना आहे. तालुक्यात आगीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वरसे येथील नाक्यावर गादी, उशा घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोवर अचानक विजेची तार पडल्याने स्पार्किंग होऊन ठिणगी गादी उशीवर पडताच आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या दुर्दैवी घटनेमुळे शहर व वरसे परिसरात चार तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.