शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

आदिवासी वाड्या सरकारी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:43 IST

पंचनाम्याची प्रतीक्षा : निसर्ग चक्रीवादळात घरांची पडझड; अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने भरपाईची मागणी

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. प्रशासनाने वादळाच्या दुसऱ्याच दिवसापासून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्गम भागातील आदिवासी वाड्यांवर अद्याप प्रशासन पोहोचले नसल्याने आदिवासी समाज आजही नुकसानभरपाईपासून वंचित राहिला आहे.३ जून रोजी निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, नारळ, सुपारी, आंबा, काजूंच्या हजारो हेक्टरवरील बागा या अशरक्ष: भुईसपाट झाल्या. अलिबाग, मुरूड, पेण, कर्जत, रोहा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यांत सर्वाधिक फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड झाली. तर १४ हजार ७०५ विजेचे खांब, तारा पडल्या. पुन्हा वीज सुरळीतपणे सुरू करण्यात प्रशासनाला आता काही प्रमाणात यश आले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले होते. त्याचे फलित म्हणून जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये आपदग्रस्तांना सरकारकडून आता मदत करण्यात येते आहे. मात्र जिल्ह्यातील दर्ु्गम भागांमध्ये असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. काही घरांचे छप्पर उडून गेले आहे. घरांवर झाडे पडल्याने वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी एकत्र येत ती बाजूला केली आहेत. बहुतांश पडलेल्या तसेच छप्पर उडालेल्या घरांतील अन्नधान्य आणि कपडे भिजून खराब झाले आहेत.जिल्ह्यामध्ये सुमारे अकराशे आदिवासी वाड्या आहेत. तेथे ६६ हजारांच्या आसपास आदिवासी, कातकरी, डोंगरकोळी, कोळी यासह अन्य नागरिक राहतात. येथील काही ठिकाणी अद्याप प्रशासनामार्फत पंचनामे करण्यासाठी कोणताच कर्मचारी पोहोचलेला नाही. शहरालगत असणाºया तसेच ग्रामपंतायतींच्या जवळ असणाºया आदिवासी वाड्यांवर प्रशासन पोहोचले आहे हे नाकारता येणार नाही. ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचलेले नाही त्या ठिकाणी तातडीने पोहोचून आदिवासी बांधवांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी युसूफ मेहरअली सेंटरचे संतोष ठाकूर यांनी केली. आदिवासी बांधवांना तातडीने पैशाच्या स्वरूपात मदत करता येत नसेल तर त्यांना घरांचे छप्पर बसवण्यासाठी, भिंती उभारण्यासाठी वस्तू स्वरूपात मदत देणे गरजेचे आहे. त्यांना तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करणे आवश्यक असल्याचे ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासन या ठिकाणी पोहोचलेले नाही. त्याचप्रमाणे मुंबई, पुण्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतून, राज्यांतून मदतीचा हात पुढे आलेला नाही, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.पेण तालुक्यातील दर्गावाडी आदिवासी वाडीवरील मोहन वाघमारे यांच्यापर्यंत सरकारची मदत पोहोचलेलीच नाही. तेथील पंचनामे करण्यासाठी प्रशासनच पोहोचले नसेल तर मदत मिळणार तरी कशी? मोहन वाघमारे हे जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांत मदत न पोहोचल्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.प्रशासनाला तातडीने त्यांच्यापर्यंत पोहोचून मदतीचा हात देणे गरजेचे आहे. प्रशासनाची मदत पोहोचली नाही तरी ते स्वत:च्या हिमतीवर उभे राहतीलही, मात्र पुन्हा ते मुख्य प्रवाहापासून दूर लोटले जातील, अशी भीतीही नाकारता येणार नाही.दरम्यान, सर्वत्र पंचनामे सुरू केल्याचे सातत्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता त्यांच्या प्रशासनाला दुर्लक्षित क्षेत्रातील पंचनामे करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आमच्या वाडीवर माझ्यासह अन्य घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोणाचे घर पडले आहे, तर कोणाचे छप्पर उडाले आहे. सरकारने मदत केल्याचे बोलले जाते, मात्र अद्याप आमच्यापर्यंत प्रशासन पोहोचलेच नाही. मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे.- मोहन मोतीराम वाघमारे, दर्गावाडी, पेण