शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

सौर ऊर्जेवर चालणार वावळोली येथील आदिवासी आश्रमशाळा

By admin | Updated: April 13, 2016 01:24 IST

ग्रामीण भागातल्या आदिवासी मुला-मुलींना शिक्षण मिळावे या हेतूने १९५८ मध्ये शिक्षणमहर्षी कै. दादासाहेब लिमये यांनी सुरू केलेल्या वावळोली येथील कुलाबा जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत

पाली : ग्रामीण भागातल्या आदिवासी मुला-मुलींना शिक्षण मिळावे या हेतूने १९५८ मध्ये शिक्षणमहर्षी कै. दादासाहेब लिमये यांनी सुरू केलेल्या वावळोली येथील कुलाबा जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत आज ९५० विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण शाळेला २४ तास पुरेल अशी सोलर वीजनिर्मितीचा ३० किलोवॅट क्षमतेचा प्लांट इंडिया बुल्स फाउंडेशनच्या मदतीने पूर्ण होवून मंगळवारी आश्रमशाळा वीजमुक्त झाली आहे.इंडिया बुल्स फाउंडेशनचे कार्यकारी संचालक महंमद आली सलील यांच्या हस्ते सोलर प्लांटचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक गरजा आपल्या कुवतीनुसार पूर्ण करण्याच्या व शाळेच्या प्र्रगतीच्या उद्देशाने सुमारे ३० लाख रुपये किमतीचा हा एबीएस एनर्जी सिस्टीमचा सोलर एनर्जी प्लांट संस्थेला देण्यात आला आहे. यावेळी बोलताना वाबळे म्हणाले की, ३० किलोवॅट वीज तयार करण्यासाठी शेकडो टन कोळसा लागतो. त्याची बचत नक्की होणार असून पर्यायाने अनेक नैसर्गिक स्रोतांची बचत यामुळे होणार आहे. याची देखरेख कशी करावी, यासाठी कंपनीतर्फे एका कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी फाउंडेशनच्या उपमहाव्यवस्थापिका नूरजहाँ शेख, सुनील वाबळे, जयंत रुठे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लिमये, सचिव प्रतिभा दुर्वे, सुएसोच्या संचालिका शिल्पा लिमये सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)महावितरणचे विजेचे एका महिन्याचे सुमारे ४० हजार रुपये बिल या सोलर प्लांटमुळे वाचणार आहे. संस्थेच्या वतीने सर्व शैक्षणिक, भौतिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असताना शाळेतील शिक्षकवृंद आदिवासी मुलांना योग्य अध्यापन करत असल्यामुळे आज अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शासकीय व प्रायव्हेट सेक्टरमध्ये उच्च पदावर काम करीत आहेत. हाच आमचा सर्वांचा आनंद व अभिमान आहे. - रवींद्र लिमये, अध्यक्ष, कुलाबा आदिवासी आश्रमशाळा, वावळोली